💥संविधान गौरव समितीच्या वतीने मोगले,ठाकूर आणि कांबळे यांचा सत्कार....!


💥सत्कारमूर्तीच्या कार्याचा गौरव करून त्यांचे आयुष्य निरोगी व सुख शांतीने व्यतीत होण्यासाठीच्या मंगल भावना व्यक्त केल्या💥

पूर्णा : सुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत,कवि,ख्यातनाम साहित्यिक हे नुकतेच रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले,सोबतच कांचन ठाकूर हे नव्यानेच पूर्णा रेल्वे इन्स्टिट्यूट या कर्मचाऱ्यांच्या संस्थेवर संघ युनियन कडून सचिव पदी बहुमताने निवडून आले,आणि सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटनेचे नेते अशोक व्हि कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कर्तबगार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नेत्यांचा संविधान गौरव समितीच्या वतीने संविधान गौरव समितीचे प्रमुख रिपाई नेते प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य सत्कार करण्यात आला,या प्रसंगी या सत्कार मुर्तींना शाल,पुष्पहार,आणि भेट वस्तू देऊन करण्यात आला.


याप्रसंगी गौरव समितीचे  मा प्रा डॉ.आदिनाथ इंगोले,प्रा.अशोक कांबळे,गटनेते उत्तम खंदारे,ऍड धम्मा जोंधळे यांनी सत्कारमूर्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करून त्यांच्या भावी आयुष्य निरोगी आणि सुख शांतीने व्यतीत होण्यासाठीच्या मंगल भावना व्यक्त केल्या रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी आपल्या मनोगतात प्रा प्रकाश मोगले,प्रा अशोक कांबळे, आणि प्रा डॉ आदिनाथ इंगोले यांचे मनस्वी आभार मानून त्यांना धन्यवाद दिले,की त्यांनी पूर्णेतील गौरव सोहळ्यात तनमन धनाने सेवा दिली,म्हणूनच पूर्णेत 20 वर्षांपासून संविधानाचा जागर अखंडितपणे सुरू आहे

त्यांनी आपल्या आपल्या मनोगतात,पूर्णा शहरात स्वाभिमानी आंबेडकरवादी चळवळ चालली पाहिजे,त्यासाठी वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या सुजाण व्यक्तींनी आपले योगदान द्यावे असे नम्र आवाहनही केले.गटागटाने आपली शक्ती नाहक वाया जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त करून किमान समान कार्यक्रमावर एकत्र येऊन पूर्णेत सर्व आंबेडकरवादी एकसंघ आहेत हे,राज्याला दाखवून द्यावे,पूर्णेतील तरुणांनी आपल्या ऐक्याच्या बळावर अनेक उपक्रम राज्याला दिले,त्यातील "संविधान गौरव सोहळा" हा एक स्तुत्य उपक्रम आहे,त्याप्रमाणेच धम्माची चळवळही मोठ्या थाटात येथे रुजविली,त्याचे अनेकांनी अनुकरण करतात,आता ऐक्याचा उपक्रमही पुरनेतून सुरू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

       सत्काराला उत्तर देतांना प्रा.डॉ.प्रकाश मोगले यांनी पूर्णा शहरात रेल्वेची सेवा करतांना संविधांनाचाही जागर करण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि पूर्णेकरांनी आपल्यावर निःस्वार्थ प्रेम केले,आणि आपल्या साहित्य सेवेसाठी प्रचंड ऊर्जा दिली,त्याबद्दल धन्यवाद दिले कामगार नेते अशोक कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले,या सत्कार समारंभात सुनील जाधव,विजय जोंधळे,शिवाजी वेडे,मोहन लोखंडे,सिद्धर्थ भालेराव,महानंद गायकवाड, पि जी रणवीर,पंडित डोंगरे,दिलीप गायकवाड,प्राचार्य केशव जोंधळे, प्रा गौतम काळे,प्रदीप ननावरे,भीमा वाहूळे,बंडू गायकवाड, बाबाराव वाघमारे,बोधाचार्य त्र्यंबक कांबळे, शिवाजी थोरात,किशन ढगे, शामराव जोगदंड,प्रभाकर त्रिभुवन,प्रकाश वाहूळे,भारत जोंधळे, रमेश बरकुंटे,आदि मान्यवरांनी सत्कार कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या