💥प्रहार जनशक्ती पक्षाचा दणका : निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार करताच रातोरात रस्त्याचे काम नव्याने सुरू....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारी मुळेच या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत महानगर पालिका खडबडून जागी झाली💥


परभणी - परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने गवळी गल्ली मधील सुभाष रोड ते गौरक्षण या रस्त्याचे नव्याने केलेले सिमेंट काँक्रीटचे काम निकृष्ट दर्जाचे आहे व त्याची त्रयस्थ एजन्सी मार्फत गुणवत्ता तपासणी करावी अशी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शुक्रवार दि.०६ मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी मॅडम यांच्या कडे करण्यात आल्या नंतर अवघ्या २४ तासात म्हणजे शनिवार ०७ मे २०२२ रोजी परभणी शहर महानगपालिकेच्या वतीने संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाच्या त्या रस्त्यावर नवीन रस्ता बनविण्याचे काम रातोरात सुरू करण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारी मुळेच या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत महानगर पालिका खडबडून जागी झाली असून केवळ प्रहार च्या सतर्कते मुळेच या रस्त्याचे काम नव्याने सुरू झाले या बद्दल परिसरातील नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत शिवाय सुरू करण्यात आलेल्या रस्त्याच्या नवीन कामाची गुणवत्ता तरी चांगली असावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गवळी गल्ली मधील सुभाष रोड ते गौरक्षण या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम साधारणतः एक महिन्यापूर्वी करण्यात आले होते हा रस्ता पूर्णत: निकृष्ट दर्जाचा असून रस्ता वाहतुकीसाठी  खुला केल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच या रोडवरील गिट्टी व रेती खुली झाली व रस्त्यावरती खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाचे पुरावे घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती व गवळी गल्ली येथील सुभाष रोड ते गोरक्षण या नव्याने झालेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याची त्रयस्थ एजन्सी मार्फत गुणवत्ता तपासणी करून संबंधित कामावर लक्ष ठेवणारे अभियंते व निकृष्ठ दर्जाचे काम करणारे ठेकेदार यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्यांना काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधित कामासाठी वितरीत होणारा शासकीय निधी तात्काळ थांबवावा व या बाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली होती.

शहरात प्रशासनाच्या च लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने निकृष्ठ व बोगस काम करणाऱ्या काही ठराविक कंत्राटदारांचे रॅकेट असून ते सध्या महानगर पालिकेत सक्रिय आहे हे रॅकेट उध्दवस्त करून परभणीतील नागरीकांना चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व परभणी शहरातील जनतेला न्याय मिळवून द्यावा असे ही या निवेदनात म्हंटले होते.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर चिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख श्याम भोंग, धर्मेंद्र तुपसमिंद्रे, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या