💥पुर्णा नगर परिषदेतील घोटाळेबाज भ्रष्ट अधिकारी पित्तळ उघडे पडताच फरार ? शहरातील नागरी सुविधा हद्दपार...!


💥नगर परिषदेत जवाबदार अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची काम खोळंबली💥

 पुर्णा ; पुर्णा नगर परिषदेतील जवाबदार अधिकारी घोटाळे करून फरार असल्यामुळे संपूर्ण नगर परिषद ओस पडल्याचे निदर्शनास येत असून नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र जन्म/मृत्यू प्रमाणपत्र,नाहरकत प्रमाणपत्रांसह विविध कामांसाठी अक्षरशः चप्पला फाटोस्तर चकरा माराव्या लागत असून संबंधित भ्रष्ट घोटाळेबाज अधिकारी मात्र आपली टक्केवारीची कामे मात्र नगर परिषद बंद झाल्यानंतर नगर पालिकेत बंद दरवाज्याआड करीत असल्यामुळे बोगस विकासकामांना वेळेवर मान्यता मिळून बोगस विकासकामांची बिल मात्र वेळेवर निघतांना दिसत आहेत.

पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्टाचारात अत्यंत तरबेज असलेले कनिष्ठ अभियंता संजय दिपके यांच्या देखरेखीखाली शहरातील अनेक भागात झालेल्या विविध शासकीय विकासकामांची चौकशी करण्याचे नगर पालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्त यांनी दिलेले आदेश हवेतच जिरल्याचे निदर्शनास येत असून कनिष्ठ अभियंता दिपकेच्या चौकशी आदेशावर 'गांधी छाप' पडदा झाकला गेल्यामुळे कनिष्ठ अभियंता दिपके यांचा भ्रष्ट कारभार सुरळीतपणे चालतांना पाहावयास मिळत आहे कनिष्ठ अभियंता दिपके यांच्या देखरेखीखाली दलित वस्ती सुधार योजनेसह विधार परिषद सदस्य राम रातोळीकर,राज्यसभा सदस्या फौजिया खान,विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी,विधान परिषद सदस्य विप्लव बजोरीया आदींसह अनेक राज्यसभा/विधान परिषद सदस्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या फंडातुन  शहरातील विविध भागात झालेल्या सिमेंट नाल्यांसह सिमेंट रस्ते तसेच बांधकाम संपूर्णतः बोगस व पुर्वी झालेल्या विकासकामांवरच झाल्याचे उघड झाल्यामुळे नगर पालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्त यांनी कनिष्ठ अभियंता दिपके यांच्या  चौकशीचे आदेश दिल्यानंतर देखील या आदेशाची अंमलबजावणी प्रशासक सुधीर पाटील यांच्यासह मुख्याधिकारी अजय नरळे यांनी अद्यापही केलेली नसल्याचे निदर्शनास येत असून सदरील प्रकरण उघडकीस आल्यापासून कनिष्ठ अभियंता दिपके नगर परिषदेतून अदृश्य झाल्याचे दिसत आहे.

पुर्णा नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंता दिपके यांच्या प्रमाणेच प्रशासकीय अधिकारी सस्यद इमरान सय्यद अशफाक व आस्थापणा विभागाचे प्रशासकीय अधिकारी नंदलाल चावरे यांनी देखील आपल्या पदाचा गैरवापर करीत जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांच्या खोट्या स्वाक्षरी करून लाखों रुपयांच्या देवानघेवानीतून अधिकारात नसतांना चक्क कायमस्वरूपी चार कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे प्रकरण मुख्याधिकारी नरळे यांच्या निदर्शनास येताच संबंधित दोघे ही घोटाळेबाज अधिकारी नगर परिषदेतून अदृश्य झाल्याचे निदर्शनास येत असून मुख्याधिकारी अजय नरळे हे देखील नगर परिषदेत कधी तरी एखादवेळ उपस्थित राहत असल्यामुळे नगर परिषदेचा कारभार चक्क 'बाबर भरोसे' चालत असल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची कामे अक्षरशः खोळंबली असल्याचे दिसत असून शहरात नागरी असुविधांसह अस्वच्छता पसरल्याचे दिसत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या