💥मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्काराचे वितरण ना.देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते होणार - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे


💥गंगाखेड शहरातील सिटी हॉटेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ.डॉ.गुट्टे बोलत होते💥

परभणी  (दि.०५ मे २०२२) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघांना पुरस्कार वितरण सोहळा विरोधी पक्षनेते ना. देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती या सोहळ्याचे स्वागताद्यक्ष आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली   गंगाखेड येथे परिषदेचा तालुका अध्यक्ष यांचा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा  6 मे 22 रोजी शुक्रवारी गंगाखेड येथे संपन्न होत आहे त्याची माहिती देण्यासाठी शहरातील सिटी हॉटेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . या वेळी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे उपस्थित होते यावेळी बोलताना आ.गुट्टे पुढे म्हणाले या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्यातील आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ यांना पुरस्कार देऊन प्रतिवर्षी गौरवण्यात येते या वर्षीचा हा पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष यांचा मेळावा माझ्या मतदार संघात म्हणजे  गंगाखेड येथे 6 मे रोजी शुक्रवारी संपन्न होत असून या वेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण केले जाणार आहे.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे राहणार आहेत तर या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून युवा पत्रकार विलास बडे हे उपस्थित राहणार आहेत मेळाव्यासाठी  पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  त्यांनी यावेळी केले.मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी यावेळी परिषदेच्या या पूर्वी झालेल्या सात  मेळाव्याची माहिती पत्रकारांना दिली .राज्यातील ग्रामीण पत्रकाराची दखल या निमित्ताने राज्य स्तरावर घेण्यात येते तसेच ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयन्त करण्यात येतात यावर्षी या मेळाव्याचे  संयोजन गंगाखेड तालुका पत्रकार संघाने स्वीकारले आहे असे ते यावेळी म्हणाले यावेळी प्रास्ताविक प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी केले . आभार प्रदर्शन अनिल वाघमारे यांनी केले पत्रकार परिषदेसाठी प्रभू दिपके, राजू हटेकर, लक्ष्मण माणोलीकर,सचिन देशमुख आदींनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या