💥वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले अभिवादन💥
परळी (दि.२७ मे २०२२) - परळी शहरात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज माता रमाई आंबेडकर स्मृती दिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज माता रमाई आंबेडकर यांचा स्मृतीदिन असून परळी शहरातील वंचित बहुजन आघाडी च्या संपर्क कार्यालयात बौद्ध महासभेचे यशपाल बचाटे साहेब यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली तर बौद्ध महासभेचे दत्तात्रेय डुमणे पाटील यांनी बुद्धवंदना घेतली तर अडवोकेट संजय रोडे प्रसेनजित रोडे युवक नेते राजेश सरोदे अविनाश मुंडे बालासाहेब जगतकर यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस फूल वाहून अभिवादन केले अशाप्रकारे परळी शहरातील संपर्क कार्यालयात माता रमाई आंबेडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी चे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली
0 टिप्पण्या