💥पोलिस प्रशासनाच्या या भुमिकेचे सर्वस्तरातून होत आहे कौतुक💥
फुलचंद भगत
वाशिम :- वाशिम जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारल्या पासुन अनेक उपक्रम हाती घेतले व ते यशस्वीपणे पुर्ण सुध्दा केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधिक्षक यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणे येथे जप्त असलेल्या मुददेमालाचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले की, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरी, घरफोडी सारख्या गुन्हयातील तसेच गहाळ झालेले मोबाईल, मोटारसायकल व इतर किंमती साहीत्य असा माल पोलीसांनी जप्त करून माल खान्यात दाखल केलेला आहे.जनतेने आपल्या कष्टातुन जमा केलेली पुंजी त्यांना परत केल्यास पोलीस व जनतेचे संबध हे सौदार्हपुर्ण व विश्वासपुर्ण निर्माण होतील. तसेच पोलीसांबददल ची जनतेची भावना अधिक मजबुत होईल व जनतेचे समाधान हेच आमचे उददीष्ट या संकल्पनेतुन मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह व अपर पोलीस अधिक्षक, श्री भांमरे यांचे ऊपस्थितीत पोलीस ठाण्यातील मुददेमाल मुळ मालकांना परत करण्यासाठी जुने पोलीस मुख्यालय, वाशिम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सोमनाथ जाधव
तसेच सर्व पोलीस ठाण्याचे हेडमोहरर व त्यांचे मदतनीस अंमलदारांना तसेच गुन्हयातील तक्रारदार / फिर्यादी यांना आज दिनांक २१/०५/२२ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम येथे आंमत्रीत करून वाशिम जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यातील जप्त मुददेमाल किंमत ८७.२३ लाखाचा मुळ मालकांना परत करण्यात आला आहे.त्यामध्ये सोने वस्तु किंमत ९.५५ लाख, मोबाईल किंमत २.९२ लाख, नगदी रूपये किंमत २.५५ लाख,मोटार सायकल ८.२१ लाख, चारचाकी वाहन ७ लाख, धान्य ४६.३६ लाख, शेत मोटार १२००० /- इतर १०.५० व असा एकुण ८७.२३ लाख रूपये किंमतीचा मुददेमाल मुळ मालकास परत करण्यात आला असुन यापुर्वी देखील दिनांक १५/१२ / २१ रोजी ११ कोटीचा मुददेमाल फिर्यादी यांना परत करण्यात आला होता.लाख मा.पोलीस अधिक्षक, श्री बच्चन सिंह यांनी मार्गदर्शन करतांना पोलीसांची कर्तव्य व जबाबदा- याबाबत माहीती
देवुन पोलीसांनी अधिकाधिक उत्कृष्ट कामगीरी करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येवुन यानंतरही पोलीस विभागाकडुन चांगल्या प्रकारे गुन्हे उघडकीस आणुन जनतेला त्यांचा चोरीस गेलेला तसेच गहाळ झालेला मुददेमाल परत करून जनतेचे समाधान करू या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी हेडमोरर तसेच मतदनीस पोलीस अंमलदारांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले....
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
0 टिप्पण्या