💥राज्याचे सा मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा रविवारी भव्य शुभारंभ....!


💥कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - जानिमियाँ कुरेशी 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते सिरसाळा येथे नव्याने सुरू होणाऱ्या न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केले आहे.

         सिरसाळा येथे बी.एस.एन.एल टाँवरच्या बाजूला इदगाह चौकात रविवार दि.08 मे रोजी सकाळी 11.30 वाजता न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ संपन्न होणार आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सदस्य आ.संजय दौंड हे राहणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य वाल्मिक आण्णा कराड, जि.प.गटनेते अजय मुंडे, जि.प.अध्यक्षा सौ शिवकन्याताई शिवाजी सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, जि.प.सदस्य प्रा.डॉ. मधुकर आघाव, पंचायत समितीचे सभापती बालाजी ऊर्फ पिंटू मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.टी.नाना देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुर्यभान नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, जि.प.सदस्य बालासाहेब किरवले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, सुंदररराव सहकारी साखर कारखाना तेलगाव संचालक प्रभाकर पौळ, तपोवन मा.सरपंच चंद्रकांत कराड, सिरसाळा सरपंच रामदादा किरवले, उपसरपंच इम्रानखाँ पठाण, माजी सरपंच आक्रमखाँ पठाण, माजी सरपंच वैजनाथराव देशमुख,बीड जिल्हा रूग्णालय भुलतज्ञ एम.बी.बी.एस.डी.ए. डॉ.सय्यद अब्दुल शाफे, सिरसाळा वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ मुंडे, सिरसाळा हाजी शेख मैनुभाई , सिरसाळा डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. भिमराव साळवे, सिरसाळा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष जनकराव कदम उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी तसेच निमंत्रण पत्रिका नजर चुकीने राहिल्यास हेच अग्राहाचे निमंत्रण समजून उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी, एम.बी.बी.एस.एमडी डॉ. शेख रेहान, सी.सी.वाय.एन.डॉ. सय्यद इरफान, फय्याज जानिमियाँ कुरेशी, जे.के.मेडिकल संचालक सिराज जानिमियाँ कुरेशी (9422240424) यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या