💥पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा भटकंतीची वेळ...!


💥पाणीपुरवठा योजनेच्या नावावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून शासकीय निधी गिळकृत करण्याचा केव्हा थांबेल खेळ💥

पुर्णा (दि.०९ मे २०२२) - भावनेच्या भरात अविचारीपणाने मतदान करून अकार्यक्षम लोकांच्या हातात सत्तेची सुत्रे दिल्यानंतर विकासासह नागरी सुविधांच्या अभावाला नागरिकांना कश्या प्रकारे तोंड द्यावे लागते याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुर्णा तालुक्यातील गौर गाव गावाच्या विकासासह पाणीपुरवठा  योजनेसाठी आलेला कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी शेवटी गेला तरी कुठे ? असा प्रश्न उपस्थित होणारी परिस्थिती गौर गावात निर्माण झाली असून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी खर्चून कागदोपत्री कार्यान्वित झालेली पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात मात्र अदृश्य झाल्याचे निदर्शनास येत असून गावातील नागरिकांना मागील दहा ते पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा योजनेतील नळांतून अद्यापर्यंत एक थेंब सुध्दा पाणीपुरवठा झाला नाही परंतु नळपट्टी मात्र सातत्याने वसुलीसह पाणीपुरवठा योजनेवर  कागदोपत्री कोट्यावधी रुपयांचा खर्च देखील झाल्याचे निदर्शनास येत असून एकंदर गौर ग्रामपंचायतीचा कारभार "कावळा केला कारभारी अन् विष्ठा आली दरबारी" अश्या पध्दतीचा झाल्याचे दिसत असून जनमतातून निवडून आलेल्या सरपंच सौ.पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांच्या भ्रष्ट कारभारामुळे संपूर्ण गावाच्या विकासाची अक्षरशः वाट लागल्याचे दिसत आहे.

गौर गावातील ग्रामपंचायतीला कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास संपूर्णतः अकार्यक्षम ठरलेल्या सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांच्या भ्रष्ट कारभारामुळे गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वनवन भटकंती करण्याची वेळ आली असून गावातील अबाल वृध्द माता-भगीनी पिण्याच्या पाण्यासाठी हांडे भांडे घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायदळी प्रवास करून स्वतःसह कुटुंबाची तहाण भागवत असतांना मात्र ग्रामपंचायत प्रशासनाला निदान जनाची नाही तर मनाची सुध्दा लाज वाटत नसल्यामुळे गौर ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या