💥वाढत्या महागाईमुळे जनसामान्यांसह गोरगरीबांचे लोंढे 'शिवभोजन थाळी' केंद्राकडे...!


💥पुर्णेतील डॉ.राहुल पाटील प्रतिष्ठाण संचलीत शिवभोजन केंद्राचा कौतुकास्पद उपक्रम : १ रुपयाही न घेता 'शिवभोजन थाळी'💥

संपूर्ण देशासह राज्यातही प्रचंड महागाईचा भस्मासूर डोके वर काढीत असतांना या महागाईच्या भस्मासूराच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर अक्षरशः उपिसमारीची वेळ आली असतांना राज्यातील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारणे अंमलात आणलेल्या 'शिवभोजन थाळी' केंद्रांचा सर्वसामान्य गोरगरीब जनता,रोजमजूर,शेतमजूर,ग्रामीण भागातील जनसामान्यांसाठी वरदान ठरत आहे.


शिवभोजन थाळी केंद्र संचालकांना लाभार्थ्यांकडून 'शिवभोजन थाळी' साठी केवळ १०/-रुपये मोबदला आकारणीची परवानगी बहाल केली असून राज्य शासन शिवभोजन केंद्र संचालकांना प्रति थाळी २५/- रुपये अनुदान देत असते.परंतु प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई लक्षात घेता हा दर देखुल शिवभोजन थाळी केंद्र संचालकांना परवडणारा नाही कारण या वाढत्या महागाईच्या काळात ३५/-रुपयात पोटभर जेवन मिळणे शक्यच नाही शासनाने अ,ब,क,ड नगरपालिका व माहानगरपालिका असे निकष लावत परभणी गंगाखेड सेलू येथे एका थाळीमागे ४० रुपये अनुदान दिलेले आहे व पुर्णा (क) वर्ग नगरपालिका असल्याने पुर्णेला केवळ २५ रुपये अनूदान देत आहेत. मुळात महत्त्वाची बाब म्हणजे परभणी असो की पुर्णा सर्वच ठिकाणी तेल,दाळ,गहू आदींसह सर्वच खाद्य पदार्थांसह स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे मग घरगुती असो व्यवसायिक दर प्रचंड प्यमाणात वाढलेले व सर्वत्र भाव सारखेत असताना परभणीला ४० व पुर्णेला २५ रुपये अनुदान दिल्या जात आहे अश्या या भयंकर महागाईच्या परिस्थितीत देखील पुर्णा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती लगत चालणाऱ्या डॉ.राहूल पाटील सामाजिक प्रतिष्ठाण अंतर्गत चालणाऱ्या शिवभोजन केंद्राचे संचालक मोहन गुंजकर यांनी मानुसकीचे भान जोपासत सर्वसामान्य गोरगरीब रोजमजूर शेतमजूर हमाल मापाडी आदी 'शिवभोजन थाली' लाभार्थ्यांकडून हक्काचे १० रुपये देखील न घेता २५ रुपयात समाधान मानत मोफत शिवभोजन थाळी देण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबल्याचे निदर्शनास येत त्यांनी शहरातील अंध अपंगांसह कोणीही वृध्द व्यक्ती जेवणापासून वंचीत राहता कामा नयें याकरीता 'शिवभोजन हेल्पलाईन' सुरू केली असून या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास त्या व्यक्तीला घरपोच शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था देखुल केली असून डॉ.राहूल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवभोजन केंद्र संचालक मोहन गुंजकर यांच्या या उपक्रमामुळे जनसामान्य गोरगरीब रोजमजूर शेतमजूर हमाल मापाडी या शिवभोजन थाळी केंद्राकडे आकर्षित होत असून भोजनाचा आस्वाद घेऊन परततांना आशिर्वाद ही देत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या