💥परभणी येथील कच्छी बाजार परिसरातील टिपटॉप नामक चप्पल बुटांचे दुकान आगीत जळून खाक...!


💥या भयंकर आगीत संबंधित दुकानमालकाचे मोठे नुकसान💥 

        परभणी (दि.२७ मे २०२२) : परभणी शहरातील मध्यवस्तीतील कच्छी बाजार परिसरातल्या एका चप्पल बुटाच्या दुकानास आज शुक्रवार दि.२७ मे २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास भयंकर आग लागल्यामुळे या आगीत संपूर्ण दुकान जळून भस्मसात झाले.

   शहरातील कच्छी बाजार परिसरात असलेल्या टिपटॉप नामक चप्पल बुटाच्या या दुकानास आज शुक्रवारी पहाटे ०४-०० च्या सुमारास आग लागली. आगीने पहाता पहाता रौद्ररुप धारण केले. प्रत्यक्ष दर्शनींनी अग्नीशामक दलास पाचारण केले. तेव्हा जवळपास तीन तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. परभणी, गंगाखेड, पाथरी व मानवत येथील बंब यासाठी धावून आले होते. दरम्यान, या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही, परंतु, संबंधित दुकानमालकाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या