💥पूर्णा येथील ओव्हर ब्रिजच्या कामाच्या गुणवत्तेसाठी क्वॉलिटी कंट्रोल घेणार दखल....!


💥युवा पत्रकार प्रदिप नन्नवरे यांच्या पाठपुराव्यास येणार यश💥



पुर्णा (दि.१२ मे २०२२) - येथील युवा पत्रकार प्रदिप नन्नवरे यांनी मागील सहा महिन्या पासुन येथील पुर्णा-हिंगोली रेल्वे गेट परिसरात होत असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रीजच्या कामाच्या गुणवत्ता व निकृष्टते संदर्भात एमआरआयडीसीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊन या दर्जाहीन कामा संदर्भात दोशीवर कारवाई तसेच कमी गुणवत्ता असलेल्या कामाला स्थगिती व दर्जाहीन अर्थात निकृष्ट दर्जाचे काम तोडून पुन्हा नव्याने बांधकाम करण्यासाठी सर्व एमआरआयडीसीच्या अधिकाऱ्यांना प्रदिप नन्नवरे यांनी लेखी तक्रार केली होती एवढेच नव्हे तर गेल्या नोव्हेबर २०२१ पासून ते सातत्याने या प्रकरणाचा निस्वार्थपणे पाठपुरावा करत होते आज दि १२ मे २०२२ रोजी एमआरआयडीसीचे अधिकारी यांना प्रदिप नन्नवरे यांनी फोन करून पूर्णा रेल्वे ब्रीज च्या प्रकरणाची माहिती घेतली असता एमआरआयडीसी कामाच्या क्वालिटी मध्ये तडजोड करत नाही, त्यामुळे सदरील कामातील काही ब्रीजच्या भागाचे बांधकाम आवश्यकतेपेक्षा कमी दर्जाचे झाल्याचे निदर्शनात आल्याने ते काम आम्ही पाडून नव्याने काम करणार असल्याचे प्रदिप नन्नवरे यांना सांगण्यात आले.

भविष्यातील होणारी हानी लक्षात घेता पुर्णा येथील ओव्हर ब्रीज चे काम आवश्यकतेपेक्षा कमी दर्जाचे काम तोडून पुन्हा नव्याने काम करण्याची तयारी आहे असे एमआरआयडीसीचे अधिकारी यांनी प्रदिप नन्नवरे याच्याशी बोलताना सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या