💥यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज 25 मे रोजी आयोजित केलेले आंदोलन सध्या स्थगित💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
वंचित बहुजन आघाडी हिंगोलीच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा सामन्य रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने 25 मे रोजी बोंबा बोंब आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते ..या आंदोलनाच्या धस्क्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आज दिनांक 24/05/2022 रोजी जिल्हा शल्यचिकत्सक डॉ.सुर्यवंशी, डॉ टेहरे, डॉ.पुंडगे, डॉ.चोधरी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चा करण्यासाठी बोलावले होते.
यावेळी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.. पत्र देऊन ..जिल्हा रुग्णालयात 15 दिवसामध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येईल... व प्रस्तुती विभागामध्ये तज्ञ डॉक्टरांची रिक्त जागा भरण्यात येईल.... व यापुढे नांदेड ला पेशंट रेफर करण्याचे प्रकार घडणार नाहीत...अशा प्रकारचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे..यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक नागोराव पांचाळ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव रविंद्र भाऊ वाढे,जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर,शहर अध्यक्ष शेख अटिखुर रहेमान,बबन मामा भुक्तर,युवा जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे, तालुका अध्यक्ष प्रणव जोंधळे, युवा नेते भीमराव सूर्य तळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 मे रोजी आयोजित केलेले आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असून....जर 15 दिवसांत अतिदक्षता विभाग व अन्य सुविधा उपलब्ध न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल अशी माहिती महासचिव रविंद्र भाऊ वाढे, जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर यांनी दिली....
0 टिप्पण्या