💥महिलांचा थेट ग्रामपंचायत वर बेधडक घागर मोर्चा....!


💥ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराने सिरसम वासियांचे पाण्याअभावी हाल💥

शिवशंकर निरगुडे ; हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली (दि.२४ एप्रिल) - तालुक्यातील मौजे सिरसम बु : येथे ग्रामपंचायत कार्यालयावर काल दि.२३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजता सिरसम ग्रामस्थ महिलांचा पाण्याच्या प्रश्नावर बेधडक घागर मोर्चा काढण्यात आला.ग्रामसेवक सुध्दा ग्रामपंचायत मध्ये हजर राहत नाही,व मनमानी कारभार करत आहे,

    पंधरा दिवसापूर्वी पासून विहिरीत पाणी असून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे व हेकेखोर वृत्तीमुळे नळाला पाणी सोडत नसल्याने संतप्त झालेल्या समस्त महिलांनी  एकत्र येऊन आज दिनांक 23 एप्रिल रोजी 11:30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर बेधडक पाण्यासाठी  हल्लाबोल, घागर मोर्चा काढण्यात आला.

सर्वसामान्य नागरिकांचे पाण्यावाचून बे हाल होत असून स्वराज्याच्या विहिरीत पाणी असून सुद्धा  पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायत साफ दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.  यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी दोन दिवसात गावात नळाला पाणी न आल्यास ग्रामपंचायत तालाठोक करून अनेक महिलांनी तर आत्महत्येचा ही इशारा दिला आहे. या काळात पाण्याअभावी जर माणसं मरत असतील, महिलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असतील तर इथल्या ग्रामपंचायत प्रशासनाची शोकांतिका ठरेल.

मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी विशेष लक्ष देण्याची गरज असून लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न मार्गी लावून ग्रामस्थ व महिलांना योग्य न्याय मिळावा. असे ग्रामस्थ व महिलांनी विनंती केली.महिलाची मागणी आहे,....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या