💥महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे स्वतः एवढेच ग्रंथावर प्रेम करा - प्रा.रावसाहेब क्षीरसागर


💥डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते💥


पूर्णा (जं.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे  स्वतःएवढेच ग्रंथावर प्रेम करा तरच माणसाच्या जीवनाचा विकास होतो असे प्रतिपादन प्रा.रावसाहेब क्षीरसागर यांनी केले.ते पूर्णा तालुक्यातील वझूर येथील अनुसया सार्वजनिक ग्रंथालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य ग्रंथ निवड समितीचे सदस्य प्राध्यापक डॉ रामेश्वर पवार हे होते. पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं घर हेच ग्रंथालय बनविले होते.उपेक्षित शोषीत समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तरच तुमच्या जीवनाचा उध्दार होईल असा अनमोल संदेश दिला असे क्षीरसागर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

याप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉक्टरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.यावेळी परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव विक्रम निर्मळ उपस्थित होते.कर्मचारी अच्युत शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.कार्यक्रमासाठी वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या