💥जिंतूर येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे शिक्षक व्हि.जी.कदम यांची मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर निवड...!


💥बीड येथील भगवान विद्यालयात पार पडलेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली💥

जिंतूर प्रतिनिधी बी.डी. रामपूरकर

जिंतूर : येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व्ही.जी. कदम यांची मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. बीड येथील भगवान विद्यालयात चार दिवसांपूर्वी पार पडलेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली. याबद्दल शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष पी. एस. घाडगे, माजी सरचिटणीस व्ही. जी. पवार, नूतन केंद्रीय अध्यक्ष राजकुमार कदम, , सरचिटणीस सूर्यकांत विश्वासराव, उपाध्यक्ष जी. डी. पोले, केंद्रीय उमेदवार निवड समिती सदस्य बी. टी. सांगळे आदींनी श्री. कदम यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या