💥परभणी शहरातील महानगर पालिकेच्या जलतरणनिकेत बुडून ६ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू....!


💥यापूर्वी एका लहान मुलाचा जलवाहिनीतून अडकल्याने मृत्यू झाला होता त्यापाठोपाठ दुसरी दुर्दैवी घटना आहे💥

परभणी (दि.२४ एप्रिल) - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील महानगरपालिकेच्या जलतरणनिकेत पोहण्यास गेलेल्या ६ वर्षीय अभिमन्यू धनंजय टेकाळे या चिमूकल्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवार दि.२४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमिरास घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात असून सदरील जलतरनिकेत बालकाचा बुडून मृत्यू होत असतांना जलतरनिकेतील सुरक्षा व्यवस्थेची जवाबदारी असलेला मनपा कर्मचारी काय करत होता ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान आज रविवारी सकाळी हा लहान मुलगा जलतरनिकेत पोहत होता, पोहता पोहता तो खाली सरकला,त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर तो तळास  गेला, पालकांसह अन्य प्रत्यक्षदर्शींनी शोध घेतला, अखेर तो तळाशी सापडला.अशी माहिती आहे.

दरम्यान या जलतरनिकेत यापूर्वी एका लहान मुलाचा जलवाहिनीतून अडकल्याने मृत्यू झाला होता, त्यापाठोपाठ दुसरी दुर्दैवी घटना आहे परंतू यातून कंत्राटदार, मनपा प्रशासन कोणताही बोध घेईनाशी झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या