💥वाढदिवसा निमित्त पवित्र रमजान महिण्यात रोजेकरी मुस्लीम बांधवांना इफ्तार पार्टी देऊन दिला 'राष्ट्रीय एकात्मतेचा' संदेश..!


💥पुर्णेतील तरुण सुचित मोरे यांचे होत आहे सर्वस्तरातून कौतुक💥 

पुर्णा येथील धर्मनिरपेक्षतेचे जिते जागते उदाहरण म्हणजे तरूण सुचित मोरे यांनी काल शुक्रवार दि.२९ एप्रिल २०२२ रोजी आपला वाढदिवस साजरा करीत असतांना आपले समाजा प्रती काही देणे आहे याचे भान ठेवून पवित्र रमजान महिना असल्याने रमजान महिण्यात मुस्लीम बांधव सतत महिणाभर अन्न पाण्याशिवाय कडक रोजे (उपवास) धरतात या रोजेकरी मुस्लीम बांधवांना इफ्तारची पार्टी देऊन आपणही या पवित्र रमजान महिण्याच्या पावण पर्वात सहभाग नोंदवावा या उद्देशाने पूर्णेतील सुचित मोरे यांनी शहरातील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा करून सामाजिक/राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.यावेळी मुस्लीम बांधवांनी सुचित मोरे यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे तोंडभरून कौतुक सुध्दा केले त्याबद्दल त्यांनी तमाम मुस्लीम बांधवांचे मनपुर्वक आभार मानले आहे. 


यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सुचित मोरे म्हणाले की राज्यात आजकाल काही राजकीय तथा तथाकथित पक्ष संघटना राजकीय संघटना व त्यांचे समाजकंटक प्रवृत्तीचे नेते राजकीय सत्ता येत नाही या नैराश्यातून स्वताचे राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत व तत्वभ्रष्ट विकाऊ प्रसारमाध्यमांमध्ये चमकोगिरी करून फोडा आणि राज्य करा या नितीचा वापर करून सत्ता संपादन करण्याचा प्रयत्न करत असल्याने या पार्श्वभूमीवर   माझी सर्वांना विनंती आहे की हा कुटील डाव तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत हानून पाडावा आणि देशात अराजकता पसरवणाऱ्यांचा कुटील डाव हानुन पाडावा व महत्वाच्या मुद्यांवर आपलं लक्ष केंद्रित करावे असेही यावेळी ते म्हणाले.


पुढे वेळी पुढे बोलतांना सुचित मोरे म्हणाले की या देशातील तमाम हिंदू व मुस्लिम तरुणांना मला सांगायचंय कि हे सत्तेचे भूकेले लोक व्ययक्तिक स्वार्थासाठी सुपारी घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि आपण या षड्यंत्राचा नाहक बळी पडत आहोत विचार करा जे दंगे भडकवत आहेत त्यांना झेड प्लस सुरक्षा आणि जे आपल्या मुलभुत हक्कांची रक्षा करायला रस्त्यावर येत आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कालकोठडीत डांबले जात आहे. 

मित्रांनों हे देशातील तरुण पिढीला बर्बाद करण्याचं कटकारस्थान आहे संयमाने काम घ्या, आगोदर मुलभूत अधिकारांवर घनाघात करायचा आणि त्याला विरोध दर्शवणाऱ्यांना देशद्रोही दहशतवादी ठरवून त्यांचे उभे आयुष्य उध्वस्त करान्याच महापाप या देशात केल्या जात आहे त्यामुळे आपल्या अधिकारांच रक्षण कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीतच राहून करा‌ असे ही यावेळी सुचित मोरे म्हणाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या