💥जिंतूर येथे मोबाईल बॅटरीला डिटोनेटर जोडल्याने भयंकर स्फोट...!


💥स्फोटात दोन मुले गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना💥

परभणी (दि.१३ एप्रिल) : जिल्ह्यातील जिंतूर शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील जिंतूर-जालना रस्त्यावरील एका शेतावरील आखाड्यावर मोबाईलच्या बॅटरीला डिटोनेटर जोडल्याने भयंकर स्फोट होवून या स्फोटात दोन मुले गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना आज बुधवार दि.१३ एप्रिल २०२२ रोजी घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.


या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की जिंतूर शहरापासून १ किलोमीटर अंतरावरील जालना रस्त्यावरील एका शेतात असलेल्या आखाड्यावर राहणार्‍या दोघा मुलांनी मोबाईलच्या बॅटरीला डिटोनेटरचे कनेक्शन लावल्याने आज दुपारी बुधवार दि.१३ एप्रिल रोजी १२-०० वाजेच्या सुमारास भयंकर स्फोट झाल्याने या स्फोटात अमन शाहीद खान पठाण वय १३ वर्ष व शेख असलम शेख अब्दुल वय १० वर्ष ही दोन मुल जखमी झाली.

        हे दोघेही रस्त्यावरील वॉशिंग सेंटरजवळ पडलेल्या ब्लास्टींगसाठी लागणार्‍या जिलेटीनच्या कांड्यांना उडविण्यासाठी पडलेल्या डिटोनेटरच्या संचाबरोबर खेळत होते. दोघांनी स्वतःजवळील मोबाईलची बॅटरी काढून त्याचे कनेक्शन या डिटोनेटरला जोडले. त्यामुळे ही दुर्देवी घटना घडल्याची माहिती हाती आली आहे.

        दरम्यान, या दोघा जखमींना परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून जिंतूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला...

*बातमीतील छायाचित्र क्र.१ संग्रहीत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या