💥पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने नागरीकात घबराहट....!


💥नागरीकांचे आरोग्य धोक्यात,आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज💥

(फुलचंद भगत)

मंगरुळपीर:-लगतच्या जांब ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या डेरेकाॅलनीमध्ये खडसे नावाच्या व्यक्तीच्या बोअरवेलच्या पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने एकच खळबळ ऊडाली आहे.यामुळे नागरीकांचे आरोग्य बिघडन्याची शक्यता नाकारण्यात येत नसल्याने आरोग्य विभागाने त्वरीत लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


        मंगरुळपीर लगतच्या जांबरोडवरील डेरेकाॅलनीमधील खडसे  यांनी बोअरवेलमधुन पाणी भरले.सदर पाणी बकेटमध्येही भरले असता त्या बोअरवेलमधुन बकेटीतल्या पाण्यात नारूसदृश्य कृमी असल्याचे लक्षात आले.ही बाब लगेच परिसरातील नागरीकांना समजताच पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.शासनाने नारूचे ऊच्चाटन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले असतांना असा पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्यामुळे नागरीकांमध्ये आरोग्याविषयी भिती निर्माण झाली आहे.आरोग्य विभागाने याबाबीची दखल घेवुन याविषयी माहीती घेवुन त्वरीत ऊपाययोजना कराव्यात अशी मागणी आता नागरीकांमधून होत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या