💥पुर्णेतील ८ वर्षीय कैफ खान अकरम खान पठाण व ६ वर्षीय बाबर अकरम खान पठाण या चिमुकल्यांनी धरला रोजा...!

💥शहरातील सर्व नागरिकांसह आप्त नातेवाईका कडून या चिमुकल्यांचे होत आहे कौतुक💥

पुर्णा : शहरातील डोबी गल्ली परिसरातील ०८ वर्षीय कैफ खान अकरम खान पठाण व ०६ वर्षीय बाबर खान अकरम पठाण या दोन्ही चिमुकल्या पठाण बंधूंनी आज शुक्रवार दि.२२ एप्रिल २०२२ रोजी पवित्र रमजान महिन्यातला पहिला रोजा (उपवास) धरला असून हे चिमुकले पठाण बंधू येथील समाजसेवक अकरम खान पठाण यांचे सुपुत्र तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अकबर खान पठाण साहब यांचे नातवंड आहेत. 

सध्या एप्रिल महिन्याचा कडकडीत उन्हाळा सुरु असून शहरात सर्वत्र ४६ डिग्री सेल्सियसचे कडक तापमान आहे आणि अश्या कडकडीत तापमानात मोठ्या मानसांचा पाण्याअभावी जीव तगमग होत आहे तरीही या दोन्ही चिमुकल्या भावांनी कडकडीत उपवास रोजा धरला म्हणून परिसरासह शहरातील ताडकळस सर्व नागरिकांसह परिवारातील त्यांचे काका इसूब खान अकबर खान पठाण,असद खान अकबर खान पठाण यांच्यासह आप्त नातेवाईका कडून या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या