💥गंगाखेडला द्वादशी पंगत, महापुरूष जयंती एकाच मांडवात....!


🔹साई सेवा प्रतिष्ठाणने साकारली ‘जातमुक्त महापुरूष’ संकल्पना🔹

गंगाखेड : महापुरूषांना जात नसते. म्हणून त्यांच्या जयंत्या सर्व जातींनी एकत्र येवून साजऱ्या केल्या पाहिजेत, अशी संकल्पना महात्मा फुले यांच्या जयंती दिनी मांडण्यात आली होती. गंगाखेडच्या संत सावता माळी मंदिरात ही संकल्पना आज प्रत्यक्षात राबवण्यात आली. साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव व त्यांच्या कुटुंबियांनी याकामी पुढाकार घेतला. 


गंगाखेड येथील श्री संत सावता माळी मंदिरात यादव कुटुंबियांच्या वतीने प्रतिवर्षी द्वादशी निमित्त भोजन पंगत केली जाते. यावर्षी द्वादशी दिवशीच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या जयंतीचा योग जुळून आला. यादव कुटुंबियांनी हे तीन्ही ऊपक्रम एकाच छताखाली साजरे करण्याचा निर्धार केला. येथील संत सावता माळी मंदिरात सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. त्यांच्या अभिवादनानंतर लगेचच द्वादशी पंगत सुरू करण्यात आली. यावेळी ‘बोला पुंडलीका’ च्या गजरासह डॉ आंबेडकर व भगवान महावीर यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. महापुरूषांचे विचार आणि त्यांच्या चारीत्र्यावर प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त करण्यात आली. 

गंगाखेड बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी, जेष्ठ नेते बाबुराव गळाकाटू, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड व्यंकटराव तांदळे, शिक्षक सेनेचे राज्य सचीव बाळासाहेब राखे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, गंगाखेड शुगर चे वीज अभियंता श्री थोरे, माजी नगरसेविका सौ. वर्षा यादव, सवंगडी कट्टा समुहाचे रमेश औसेकर, बालासाहेब यादव, संतोष टोले, राजू गोरे, राजाभाऊ डमरे, व्यंकटेश यादव, धनंजय गोरे, भागवत यादव, मुन्ना भोसले, प्रथम यादव, नंदीनी यादव आदिंची ऊपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत द्वादशी पंगत सुरू होती. या ऊपक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी सहभाग नोंदवला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या