💥अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची हिंगोली येथे २७ एप्रील रोजी आढावा बैठक...!


💥महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारणीत नुकतेच फेरबदल करण्यात आले असून राज्यभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येत आहे. दि.२५ व ३० एप्रिल २०२२* दरम्यान समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब, मा.समीरभाऊ भुजबळ, मा.पंकजभाऊ भुजबळ , मा. बापूसाहेब भुजबळ यांच्या आदेशावरून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेण्यात येणार असून यावेळी प्रदेश सचिव रवीभाऊ सोनवणे , प्रदेश प्रचारक प्रा. संतोष विरकर यांची उपस्थिती राहणार आहे. 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मराठवाड्यात सहा दिवसीय दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत,प्रदेश सचिव रवी सोनवणे, प्रदेश प्रचारक संतोष विरकर यांच्या उपस्थितीमध्ये दि.२७ एप्रिल रोज बूधवार सकाळी ११ वाजता  शासकीय विश्राम गृह हिंगोली येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे तरी समता परीषदेचे जील्हा ऊपाध्यक्ष ,सर्व तालूका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, महीला जील्हा अध्यक्ष,व सर्व पदाधीकारी व समता सैनीक यांनी वेळेव ऊपस्थीत राहवे आसे आवाहन अ,भा,समता परीषदेचे जील्हा अध्यक्ष डॉ नागोराव जांबूतकर, व जील्हा कार्याध्यक्ष चंदूभाऊ लव्हाळे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या