💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन....!


💥विद्यार्थ्यांना वही,पेन व महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप करून महामानवाला एका वेगळ्या पद्धतीने अभिवादन💥 

परभणी - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त आज प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने जिल्हाभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज परभणी तालुक्यातील हिंगला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन व महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप करून महामानवाला एका वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पुष्पहार अर्पण  करून अभिवादन केले.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, हिंगला गावचे सरपंच ज्ञानेश्वर अब्दागिरे, पोलीस पाटील पंकज सोनकांबळे, शालेय समितीचे अध्यक्ष गोविंद अब्दागिरे, धर्मेंद्र तूपसमिद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, सुदाम अब्दागिरे, दत्तराव अब्दागिरे, पांडुरंग सोनकांबळे, राहुल झोडपे, शिक्षक प्रकाश बलसेटवाड व गंगाधर पुंपलवाड, भागवत अब्दागिरे, दत्तराव भोंग, पंढरी रेंगे, चंद्रशेखर अब्दागिरे, कृष्णा भोंग यांच्या सह शाळेतील विद्यार्थी व हिंगला गावचे रहवाशी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या