💥परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील नवीन जलकुंभास गळती...!


💥सुमारे ४० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या जलकुंभाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले💥

परभणी (दि.१८ एप्रिल) : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील पाणी पुरवठा सुरळीत रहावा म्हणून सुमारे तब्बल ४० लाख रुपये खर्चून उभारलेल्या जलकुंभातून पाण्याची गळती सुरु झाली आहे.

        कृषि विद्यापिठातील बोगस कामांचे एक नव्हे तर अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक नवीन किस्सा या निमित्ताने समोर आला आहे. विद्यापिठांतर्गत पाणी पुरवठ्या करीता सुमारे ४० लाख रूपये खर्चून बांधकाम विभागाद्वारे नवीन जलकुंभ उभारण्यात आला परंतु दुर्दैवाने जलकुंभ वापरण्याआधीच चोहोबाजूंनी गळू लागला आहे. यामुळे विद्यापीठांतर्गत कामांचे नमूने प्रकर्षाने समोर आले आहेत. कारण सुमारे ४० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या जलकुंभाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाकडे विद्यापीठाचे उपअभियंता टेकाळे यांनी सातत्याने दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम विद्यापीठात जलकुंभ उभारला खरा, परंतु तो जलकुंभ आता उपयोगात येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

       या जलकुंभास वापरण्याआधीच गळती लागल्याने विद्यापीठांतर्गत नागरीक कमालीचे संतापले आहेत. या प्रकरणात संबंधित अभियंत्यांसह संबंधित एजन्सीची कसून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे दरम्यान, उपअभियंता टेकाळे यांच्या गैरप्रकारामुळेच, अक्षम्य दुर्लक्षपणामुळेच असे प्रकार होत असल्याचा आरोप होतो आहे. विद्यापीठातील उपअभियंता टेकाळे यांच्याकडे सिव्हील किंवा विद्युत अभियांत्रीकीची पदवी नसतांनासुध्दा कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी त्यांच्याकडे उपअभियंता पदाचा पदभार सुपूर्द केला आहे हे विशेष.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या