💥माजलगाव तालुक्यातील सोमठाणा येथे समाजकंठक प्रवृत्तीं कडून डॉ.बासाहेब आंबेडकर जयंती मिरवनुकीवर दगडफेक...!


💥तीन घंट्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आश्वासना नंतर मिरवणुन पुन्हा सुरु ; गावात तणानावाचे वातावरण💥

💥दगडफेक करणाऱ्या समाजकंठकांवर ॲट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल💥

 माजलगाव(लक्ष्मण उजगरे)-तालुक्यातील सोमठाणा येथे गावातील काही समाजकंठक प्रवृत्तीच्या गावगुंडाकडुन शुल्लक कारणावरुन जयंती मिरवणुकीत दगडफेक व  जयंती मिरवणुकीत सहभागी असलेल्या युवक नागरीकांसोबत हुज्जत घातल्या प्रकरणी माजलगाव पोलिस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात राजरत्न किशन भालेराव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         सविस्तर माहीत अशी की माजवगाव तालुक्यातील सोमठाणा या गावात दरवर्षी प्रमाणे  याही वर्षी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल शुक्रवार दि.२९ एप्रील २०२२ रोजी भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. शांततेत मिरवणुक गावात चालु असताना गावातील व बाहेर गावातुन या जयंती मध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आंबेकर अनुयायी हे मोठ्या उत्साहात सहभागी असताना जयंती मिरवणुक गावातील मुख्य रस्त्यावर असताना  सोमठाणा गावातील जम्मु खान यांचा मुलगा मोहसिन जम्मु खान याने गंगामसला येथील प्रतिक भगवान पंडीत या युवकासोबत नाचण्याच्या कारणावरुन  वाद घातला व मिरवणुकीत वाद निर्माण केल्याने ह्या वादाचे रुपांतर भांडणात झाले.हे भांडण संध्याकाळी ०७-३० वाजे दरम्यान सुरु झाल्याने गावातील नागरीक मदन हिराजी भालेराव,सदाशिव हिराजी भालेराव,अतुल मुरली भालेराव,दयानंद भालेराव हे भाडंन सोडवण्यासाठी गेले असता गावातील नदीम नय्युम खा,सोपियान जुलु खा,मोहीन जुम्मु खा,फेरोज फत्तु खा,अकबर गफ्फार खा,नाजु फत्तु खा,कय्युम दाऊद खा,रीयाज अहमद सय्यद, अमर जुलु खा,आजिम नयुम खा इत्यादींनी सोडवा सोडव करणाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगडफेक करण्यात आल्याने बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील  यांनी सोडवा सोडव केली.यां भांडणात मदन भालेराव व सोहम माणिक भालेराव व अन्य नागरींकाना मार लागल्याने त्याच ठीकाणी मीरवणुक थांबवण्यात आली.यावेळी संबधीतावंर कार्यवाही करुन अटक केल्याशिवाय मिरवणुक पुढे घेवुन जाणार नाही अशी भूमिका घेतली असता नेरकर मॅडम(अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई),पंकज कुमावत(उपविभागीय पोलिस अधिकारी),शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनजंय फराटे,सह्यायक पोलीस अधीक्षक रश्मिका राव,पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे,एपीआय सुनिल बोडके आदींनी घटनास्थळी भेट देवुन याप्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात येईल अशी हमी दील्यानंतर मिरवणुक पुर्वत करुन विसर्जन करण्यात आले.

      या प्रकरणी रात्री १ वाजता  नदीम नय्युम खा,सोपियान जुलु खा,मोहीन जुम्मु खा,फेरोज फत्तु खा,अकबर गफ्फार खा,नाजु फत्तु खा,कय्युम दाऊद खा,रीयाज अहमद सय्यद, अमर जुलु खा,आजिम नयुम खा यांच्यावर कलम ३२३,१४३,१४७,१४९ तसेच अॅट्रासिटी अक्ट ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पकंज कुमावत हे करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या