💥पुर्णा शहरातील विजय नगरातील अवघ्या ६ वर्षीय सानिया इब्राहीम शेख या चिमुकलीने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा....!


💥या छोट्याश्या मुलीचे सर्वत्र अभिनंदन होत असून शेख अक्रम यांची ही पुतणी आहे💥

पुर्णा (दि.१५ एप्रिल) - येथील विजय नगर परिसरात राहणारी अवघ्या ६ वर्षाची छोटीशी चिमुकली कु.सानिया इब्राहिम शेख यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवला असून चिमुकली सानिया शेख हिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

मुस्लिम समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र असा रमजान हा महिना असून पुर्णा येथील विजय नगर मधील रहिवाशी शेख इब्राहिम यांची सहा वर्षाची मुलगी सानिया इब्राहिम  यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवला या वर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा व आजवरच्या तापमानात सर्वात जास्त तापमान असलेला एप्रिल महिन्यात आलेला हा रमजानचा महिना आणि त्या मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता ही उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रास होतो त्यात या सहा वर्षांची चिमुकलीने पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला त्यामुळे या छोट्याश्या मुलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.शेख अक्रम यांची ही पुतणी आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या