💥भारतीय खाद्य निगम यंत्रणा ठरली संजीवनी - आमदार मेघना बोर्डीकर


💥भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने बुधवारी शहरातील माऊली मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.२८ एप्रिल) - भारतीय खाद्य निगम  देशातील नागरिकांना संजीवनी ठरली असल्याचे मत आमदार मेघना साकोरे बोडीकर यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने बुधवारी शहरातील माऊली मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोपल, जिल्हा उपविभागीयअधिकारी अरुणा संगेवार,पुरवठा अधिकारी सुशांत शिंदे,तहसीलदार सखाराम मांडवडे खाद्य निगमचे विभागीय प्रबंधक राजेन जनबंधू ,भाजपाचे ता. अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, मा. नगर अध्यक्ष मुन्ना गोरे आदींची व्यासपीठावर उपस्थित होती. आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, देशातील २३३ कोटी लोकसंख्येपैकी २०० कोटी लोकांना खाद्य निगम यंत्रणेच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. देशात दोन वर्ग  तसे ही यंत्रणा नागरिकाना धान्य पुरवठा करू शकते. भारतीय अमृत महोत्सव साजरा करताना देशवासीयाना ही माहिती असणे गरजेचे आहे. महामारीच्या काळात केंद्र सरकारने प्रभावीपणे  केंद्र राबविल्यामुळे आपण आज एकत्र येथे बसलो आहोत. शेजारील देशालामुद्धा आपण कोरोना प्रतिबंधक लस्सीच्या डोसचा पुरवठा पंतप्रधानांनी करून शेजारधर्म पाळला. कोरोना काळात कोणी उपाशीपोटी राहू नये, म्हणून पाच खाद्य निगम योजनेच्या माध्यमातून सुरळीत यंत्रणा राबवत गरजपर्यंत अनधान्य पुरविले असल्याचे सांगून किसान अनुदान खात्याची केवायसी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली उपस्थित महिलाशी हिलगूज सावले. स्मिता शिंदे यानी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास ग्रामसेवक, तलाठी,महसूल अधिकारी, कर्मचारी, राशन दुकानदार , पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या