💥पुर्णा शहरात मध्यरात्री अवेळी अतिरेकी लोडशेडींग : शहरातील सर्वधर्मीय नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण....!


💥नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यास जवाबदार कोण ? लोडशेडींगच्या वेळेत तात्काळ बदल कण्याची मागणी💥

पुर्णा (दि.२२ एप्रिल) - भर उन्हाळ्याचे दिवस त्यातही मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना या महिण्यात मुस्लीम बांधव माता-भगीनी बिना अन्न पाण्याशिवाय रोजे अर्थात कडक उपवास करतात अश्या या भयावह परिस्थितीत महाराष्ट्रात विज टंचाईचे महाभूत आघाडी सरकारकडून जनसामान्यांच्या मानगुटीवर बसवले जात असून अतिरिक्त भारनियमनास अर्थात लोडशेडींगला सुरूवात करण्यात आली असून दिवसा तर दिवसा आता मध्यरात्री सुध्दा अवेळी लोडशेडींग घेतल्या जात असल्यामूळे जनसामान्यांत तिव्र असंतोष पसरला आहे सक्तीच्या विज बिल वसूली नंतर तरी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महा वितरण) कडून सुरळीतपणे विजपुरवठा केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती ही अपेक्षा मात्र सपसेल फोल ठरली आहे.

पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात लोडशेडींग मुळे अक्षरशः हाहाकार माजला असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून ठराविक मध्यरात्री ०२-३० ते ०४-३० ऐवजी मनमानी व अतिरेकी पध्दतीने ०१-०० ते ०४-३० वाजेपर्यंत तर सायंकाळी ०६-४५ ते ०९-०० वाजेपर्यंत लोडशेडींग घेण्यात येत असल्यामुळं नागरिकांमध्ये तिव्र असंतोषाचे वातावरण पसरले असून नागरिकांच्या असंतोषाचा केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नसून नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यास यास सर्वस्वीपणे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकारीच जवाबदार राहतील यात तिळमात्र शंका नाही.

💥मध्यरात्रीच्या वेळेला लोडशेडींग (अतिरिक्त भारनियमन) ची आवश्यकता कशासाठी ?


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महा वितरण) कडून दिवसासह ऐन मध्यरात्री नियमीत वेळेऐवजी ०१-०० ते सकाळी ०४-३० वाजेच्या सुमारास घेण्यात येणारे नियमबाह्य भारनियमन सर्वसामान्यांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत असून दिवसा घेतलेले अतिरिक्त भारनियमन सर्वसामान्यांना मान्य असले तरी मध्यरात्री महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून घेण्यात येणारे अतिरिक्त भारनियमन कशासाठी व कोणासाठी ? असा प्रश्न उपस्थित होत असून मध्यरात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकारचा लोड नसता मग लोडशेडींग घेण्याचा अट्टाहास का ? कारण दिवसा संपूर्ण व्यापारपेठ खुली असते व्यवसायिक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एसी/कुलरसह पंख्यांचाही वापर मोठ्या प्रमाणात करतात शिवाय इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स दुकानांवर तसेच पिठाच्या गिरण्या,मिरची कांडप,बेकरी,टेलर्स,वेल्डींग वर्कस्,बिअर बार रेस्टॉरंट,वॉटर सर्विसिंग,वॉटर फिल्टर लकडी कटाई मशीन,पेथॉलॉजी लेब,रुग्नालयांमध्ये इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो त्यामुळे विजपुरवठ्यावर लोड येतो परंतु रात्रीच्या वेळेस आदी सर्वच प्रतिष्ठाण बंद असल्याकारणाने लोड येण्याचा व लोडशेडींग घेण्याचा प्रश्नच येत नाही मग मध्यरात्रीच्या सुमारास घेण्यात येणारी ही लोडशेडींग कशासाठी व कोणासाठी ? असा प्रश्न उपस्थित होत असून रात्रीच्या वेळेला अवैधरित्या चालणाऱ्या रेती धक्यांवरून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांना सोईस्कररित्या रेती तस्करी व इतर अवैध व्यवसायिकांना अंधारात कंधोरी करता यावी यासाठी तर लोडशेडींगचा अट्टाहास नव्हे ना ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच म्हणावे लागेल.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या