💥जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसातील जिल्हा परिषद आदर्श शाळेत शाळा पूर्व तयारी व पालक मेळावा संपन्न....!


💥या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच श्रीमती दिपा संदीप चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती💥

 जिंतूर प्रतीनिधी / बी.डी.रामपूरकर         

जिंतुर : तालुक्यातील आदर्श शाळा ओळखली जाणारी सावंगी म्हाळसा येथील जि प शाळेत शाळा पूर्व तयारी व पालक मेळावा घेण्यात आला. सुरुवातिला आकर्षक अशी वेगवेगळ्या भूषेत लहान लहान मुलांनी फेरी काढून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. शाळा पूर्व तयारीत इ पहिलीच्या वर्गात 25 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला त्याचे शाळे तर्फे स्वागत करण्यात आले. जि प सावंगी म्हाळसा ही राज्य शासनाने निवड केलेली 488 पैकी एक आदर्श शाळा म्हणून ही शाळा आदर्श ठरली, इ.2020-21 या आर्थिक पहिल्या टप्प्यात विकसित करण्याचा 500 शाळा पैकी c1 मोडेल स्कूल सावंगी म्हाळसा हिची निवड करण्यात आली . 

    या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती दीपा संदीप चव्हाण सरपंच,प्रमुख पाहुणे डॉ शिवप्रसाद सानप, शालेय समितीचे गजानन चव्हाण,योग शिक्षक सचिन रायपत्रीवार, मुख्याध्याक चव्हाण सर यांनी पालक व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. उपस्थितीत शिक्षक आनंद लोखंडे, अंकुश आव्हाड, विकास धनवे,अमोल चावरे, श्रीमती अर्चना निरगुडे, श्रीमती सुशीला नवले, देशपांडे विध्यर्थी पालक उपस्थित होते.या शाळापूर्व तयारी व पालक मेळाव्यास पालकांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. कोरोना संक्रमणा मुळे  दोन वर्षापासून शाळा बंदच होत्या.पण सद्य्या कोरोना आटोक्यात आल्याने सर्व परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याने विशेषता बालगोपाल विद्यार्थ्यांत प्रचंड उत्साह दिसून येत आहे.शाळापूर्व तयारीच्या बालगोपाल विद्यार्थी व शिक्षकांच्या आकर्षक काढलेल्या रॅली कडे ग्रामस्थांचे  लक्ष वेधले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या