💥नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ संपल्यामुळे गुरूद्वारा बोर्ड तात्काळ बरखास्त करा अन्यथा तीव्र आंदोलन....!


💥असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स.मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी दिला आहे💥


नांदेड (दि.28 एप्रिल) - नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ संपल्यामुळे व बोर्ड कायद्याप्रमाणे काम करत नसल्यामुळे बोर्डाला शोखास नोटीस देऊन गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करावे व नवीन गुरुद्वारा बोर्ड गठीत होईपर्यंत प्रशासकीय समितीची नेमणूक करा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिंतूर-गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक स. मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविले आहे.

नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ मागील 8 मार्च 2022 रोजी संपला असून गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकार्‍यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर सदस्य यांच्यामध्ये बेबनाव झाल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून नांदेड गुरुद्वारा बोर्डाची बैठक झाली नाही, त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे बजेट सुद्धा पास करण्यात आलेले नाही. स्थानिक सदस्य व अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा हे बेकायदेशीर कामे करत आहेत. त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. बेकायदेशीर कामे केल्यामुळे स्थानिक सदस्य व अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांची समाजामध्ये प्रतिमा मलीन झाली आहे. बोर्डाचे कर्मचारी सुद्धा स्थानिक सदस्य व अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांचे आदेश ऐकायला तयार नाही. या बेबनावामुळे येणार्‍या भाविकांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे उत्पन्न घटले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने नांदेड गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करून नवीन गुरुद्वारा बोर्डाचे गठन होईपर्यंत नांदेड येथील स्थानिक समाजामधून प्रशासकीय गुरुद्वारा बोर्ड समितीची नेमणूक करण्यात यावी. ही मागणी पूर्ण न झाल्यास अन्यथा नांदेड येथे शीख समाजाच्या वतीने येणार्‍या पंधरा दिवसानंतर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल, याची शासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही निवेदनात स. मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रति राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण,खा.सुप्रियाताई सुळे,प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई यांना पाठविल्या आहेत....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या