💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या सुबुद्धी महायज्ञ आंदोलनाला यश.....!


💥तिन वर्षापासून बंद असलेल्या दुधना नदीवरील हिंगला गावाजवळील पुलाचे काम सुरू💥


परभणी (दि.२० एप्रिल) - परभणी तालुक्यातील दुधना नदीवरील हिंगला गावाजवळील पुलाचे काम मागील तीन वर्षापासून बंद होते. हा पुल अर्धवट बांधलेला असल्याने या पुलाचा वाहतुकीसाठी काहीच उपयोग होत नव्हता. परभणी ते हिंगला व पुढे वाडी दमई, साडेगाव, मिर्झापूर, पिंपळा, जोड परळी, पिंगळी कोथळा व बोबडे टाकळी या गावाला जोडणारा तसेच परभणी ते झरी मार्गाला कमी अंतर असलेला हा एक पर्यायी रस्ता आहे.


दुधना नदीवरील हिंगला गावाजवळील पुलाचे काम पूर्ण न झाल्याने वरील गावच्या नागरीकांना परभणीला येण्यासाठी २०-२५ कि.मी. चे अतिरिक्त अंतर पार करावे लागते अन्यथा नाईलाजास्तव व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे जीव धोक्यात घालून नदी पत्रातून प्रवास करावा लागतो. पावसाळयात नदी पात्रात पाणी असल्याने या मार्गावरील वाहतुक चार - पाच महिने बंदच असते. बाकी ऋतूत या परिसरातील गावकऱ्यांना नदी पत्रातून जीवघेणा प्रवास केल्या शिवाय कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही या बाबत  परिसरातील गावातील ग्रामस्थांनी या पुलाचे काम तत्काळ मार्गी लावावे या साठी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी तक्रार केली होती याच तक्रारीची तत्काळ दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तत्काळ पुलाचे काम सुरू करावे या साठी निवेदन देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाचे काम करण्याची सुबुद्धी यावी म्हणून पुलावर सुबुद्धी महायज्ञ आंदोलन केले होते व या आंदोलनानंतर ही जर पुलाचे काम सुरू झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात साप सोडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिला होता. या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दि.१९ एप्रिल २०२२ रोजी या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून हा पूल दि. ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रहार जनशक्ती पक्षाला दिले आहे आज २० एप्रिल २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू झालेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली व येत्या पावसाळ्या अगोदर हा पूल वहातुकीसाठी खुला केला जाईल असे गावकऱ्यांना आश्वासन दिले.

या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, हिंगला चे सरपंच ज्ञानेश्वर अब्दागिरे, उपसरपंच रमेश गोल्डे, माजी सरपंच शाहुराव अब्दागिरे, पोलीस पाटील पंकज सोनकांबळे, प्रहार चे झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, बालासाहेब तरवटे शाखा प्रमुख विष्णू गोल्डे, मट कऱ्हाळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, विठ्ठल गरुड, दत्तराव भोंग, विजयकुमार बिडकर, काशिनाथ रेंगे आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या