💥पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांचा आज 'प्रकटदिन' अभिष्टचिंतन सोहळा...!


💥शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्ष पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिकांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💥


पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांचा आज रविवार दि.१७ एप्रिल २०२२ रोजी 'प्रकटदिन' वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा असल्यामुळे त्यांच्यावर आज प्रत्यक्ष भेटून तसेच अप्रत्यक्षपणे सोशल साईटच्या माध्यमातून अनेकांनी अक्षरशः वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.


पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर श्री सुभाषचंद्र मारकड यांनी शहरासह तालुक्यात साजरे होणाऱ्या सन उत्सव तसेच महापुरूषांच्या जयंती महोत्सवांना चोख बंदोबस्त ठेवून तसेच प्रत्येक समाजाच्या सन उत्सवात प्रत्यक्षात सहभाग नोंदवून जनसामान्यांमध्ये पोलिस प्रशासना प्रती विश्वासाचे वातावरण निर्माण केले याशिवाय त्यांच्या कारकिर्दित अनेक प्रकरणांचा तडा ही ला त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.


पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांचा वाढदिवस असल्याचे समजताच आज शहरातील भिमनगर आण्णाभाऊ साठे नगर परिसरातील राज नारायनकर मित्र परिवारानेही त्यांना शाल पुष्पहार घालून व केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना.सामाजिक कार्यकर्ते राज नारायनकर युवा नेते.. नागेश भैय्या ऐंगडे.. रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे. पुर्णा शहर अध्यक्ष. मिलिंद भैय्या सोनकांबळे.. रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे.. तालुका अध्यक्ष.. संजय शिंदे आदी.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या