💥जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील शिल्पा भूतकर ठरली तालुक्यातील पहिली मिल्ट्री वूमन....!


💥गावकऱ्यांकडून जंगी स्वागत आणि मिरवणूक💥

प्रतिनिधी जिंतूर  / बि.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील शिल्पा मोकिंद भूतकर ही मुलगी वयाच्या 22व्या वर्षी सीमा सुरक्षा बल (SSB) दलात पात्र ठरली आहे. तिने भोपाळ येथे सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून ती बिहार-नेपाळ सीमेवर रुजू झाली आहे. SSB दलात महिलांमधुन पात्र ठरलेली ती जिंतूर तालुक्यातील पहिली मुलगी आहे. शिल्पाचे वडील शेती करतात तर तिच्या आईने धुणी-भांडे करून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. काल दि-१९ रोजी गावकऱ्यांच्या वतीने संपूर्ण गावातुन मिरवणूक काढून तिचे जंगी स्वागत करण्यात आले, यावेळी सावरगाव गाव आणि तांड्यातील शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते. यावेळी सावरगाव गाव आणि तांड्यातील शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते. 

शिल्पा हिचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे झाले असून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मजुरी करून तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे. शिल्पा हीने पदवी पर्यंत शिक्षण घेतले असून सन-2021 च्या सीमा सुरक्षा बल पात्रता परीक्षेत ती उत्तीर्ण झाली होती. या स्पर्धेत जवळपास दीड लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. जिंतूर तालुक्यातील ती पहिली महिला मिल्ट्री वुमन ठरली असुन सर्व क्षेत्रातुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाने गाव आणि परिसरातील मुलींना प्रेरणा मिळाली असून मुली देखील देशाच्या संरक्षणात अग्रेसर आहेत हे तिने दाखवून दिले आहे. तिच्या यशाचे श्रेय तिने तिची आई आणि वडिलांना दिले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या