💥हिंगोलीत शहरात मुलीच्या छेडछाडीवरून युवकाचा निर्घृण खून : पोलिसांनी ३ आरोपींना ठोकल्या बेड्या....!


💥पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवत तिघांना घेतले ताब्यात💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी

हिंगोली (दि.१९ एप्रिल) - शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. शुभम राजे वय २३ वर्ष असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी आज मंगळवार दि.१९ एप्रिल २०२२ रोजी पहाटे तिघांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवत तिघांना ताब्यात घेतले आहे.

मुलीच्या छेडछाडीवरून हत्या:हिंगोलीत तरुणाचा शस्त्राने वार करून निर्घृण खून, कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. शुभम राजे वय २३ वर्ष असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी मंगळवार दि.१९ एप्रिल रोजी पहाटे तिघांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवत तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील तलाव पट्टा भागात मृत शुभम राजे व बबलू धाबे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी मुलीच्या छेडछाडी वरून वाद निर्माण झाला होता. मात्र हा वाद लगेचच मिटला. नंतर मात्र, सोमवारी या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे व त्याच्या सोबत अन्य दोघे जण रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तलाबकट्टा परिसरात आले. यावेळी त्यांनी शुभमला बोलून घेत त्याच्यावर गुप्ती, खंजीर लोखंडी पाइपने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शुभम जागीच कोसळला. त्यानंतर ते तिघेही फरार झाले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. तसेच, शहरात अफवांचे पेव फुटले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कचवे गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, व्ही. पी. विठूबोणे, जमादार संजय मार्के, शेख मुजीब, शेख अमजद, शेषराव पोले यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. पहाटे तीन वाजेपर्यंत चाललेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तिघांनाही खुशाल नगर भागातून ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी शुभम राजे यांच्या आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बबलू धाबे व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला . उपनिरीक्षक विठूबोणे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या