💥करियर कट्टाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अधिकारी घडतील - प्रा.श्रीधर कोल्हे


💥"करियर कट्टा" या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते💥

पूर्णा (दि.२८ एप्रिल) - करियर कट्टाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अधिकारी व उद्योजक घडतील असे प्रतिपादन करियर कट्टाचे जिल्हा समन्वयक डॉ.श्रीधर कोल्हे यांनी केले.ते महाराष्ट्र राज्य व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने "करियर कट्टा" या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनूसया शिक्षण प्रसारक मंडळ, परभणीचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार हे होते तर उदघाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडचे अधिसभा सदस्य तथा श्री गुरूबुद्धी स्वामी महाविद्यालय, पूर्णाचे सचिव प्रा. गोविंद कदम व प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ के.राजकुमार उपस्थित होते. ग्रामीण भागातील महाविद्यालयाचे विद्यार्थी हार न मानणारे असतात त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि ज्ञान संपादन करण्याची इच्छाशक्ती जागृत ठेवली तर ते निश्चितच करियर कट्याच्या माध्यमातून स्वःताचे अस्तित्व निर्माण करु शकतील असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.


यावेळी जिल्हा समन्वयक डॉ.डी.बी.रोडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की परिश्रम करणारी मुलेच जीवनात यशस्वी होतात अशा विद्यार्थ्यांना करियर कट्टा खूप सहकार्य व मदत करेल.IAS ला आणि उद्योजक आपल्या भेटीला हे दोन उपक्रम राबवले जाणार असून 50 कोर्सेस या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले जाणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. अध्यक्षीय समारोपात प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात गांभीर्याने जगले पाहिजे तसेच योग्य वयात योग्य निर्णय घेऊन आपल्या जीवनाविषयी वाटचाल केली पाहिजे तरच जीवनात यशस्वी होता येते. विद्यार्थ्यांनी अनेक ग्रंथ वाचले पाहिजे, वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचून स्वतःचं मतपरिवर्तन केले पाहिजे तरच त्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाता येईल असेही त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात सांगितले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे यांनी मांडले.सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ.संजय कसाब यांनी केले तर आभार तालुका समन्वयक डॉ.विजय भोपाळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील व श्री गुरूबुद्धी स्वामी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करिअर कट्टाचे समन्वयक प्रा.डॉ. विजय भोपाळे,डॉ. संजय कसाब,प्रा. जगन्नाथ टोपे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या