💥जिंतूर ग्रामीण रुग्णालयांच्या अमृत महोत्सवानिमित्य योग सत्र घेऊन रुग्णाना मार्गदर्शन केले...!


💥या मेळाव्यास वैद्यकीय अधिक्षक डॉ.रविकिरण चांडगे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश बोराळकर यांची उपस्थिती💥

 जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

आजादी का अमृत महोत्सवानिमित्य भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन  ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले ह्या मेळाव्यासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ.रविकिरण चांडगे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले.

या आरोग्य मेळाव्याची सुरवात उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी योगसत्र घेण्यात आले यामध्ये सर्व व्याधी ग्रस्थ रुग्णांनी याचा अमुल्य लाभ घेतला, या शिबिरात योगाचे मार्गदर्शन करतांना योगशिक्षक डॉ, शिवप्रसाद सानप  सोबत योग शिक्षक सचिन रायपत्रीवार, बाळासाहेब रामपूरकर, यांनी केले,योग शिक्षक पल्लवी देशमुख, प्रतिभा साबळे, सुबोध मते, उद्धव सूर्यवंशी, प्रशांत घीके,महेश देशमुख, आदी योग शिक्षक यांनी सहकार्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या