💥जिल्ह्यातील शिल्लक ऊसासाठी जिल्हा प्रशनासनाचे चुकीचे धोरण जबाबदार ; जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांचा आरोप.....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बळीराजा व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात पूर्णा येथे धरणे आंदोलन💥

परभणी :- जिल्ह्यातील शिल्लक ऊसासाठी जिल्हा प्रशासनाचे चुकीचं धोरण जबाबदार असून ज्या तालुक्यात साखर कारखाना आहे त्या तालुक्यातील ऊस न घेता परजिल्ह्यातील ऊस आणून जिल्ह्यातील कारखाने चालू आहेत. जिह्यातील शिल्लक उसाची जिल्हा प्रशासनाला मुळीच चिंता नाही तर मराठवाड्यातील शिल्लक ऊस कसा गाळप करता येईल याची जिल्हा प्रशासनाला जास्त काळजी आहे. जिल्हा प्रशासनाच्या या स्थानिक शेतकरी विरोधी धोरणामुळेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे व त्यास जिल्हा प्रशासनाचे चुकीचे धोरणच जबाबदार आहे आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी आज जिल्हा प्रशासन व बळीराजा साखर कारखाना यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या पूर्णा तालुका शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय धरणे आंदोलनात केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून मोठया आर्थिक संकटात सापडला आहे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या बाबत ब्र शब्द पण काढत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे.


आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पूर्णा तहसील कार्यालया समोर पूर्णा तालुक्यातील बळीराजा साखर कारखान्याने परजिल्ह्यातील ऊस खरेदी तत्काळ बंद करून पुर्णा तालुक्यातील सभासद व बगर सभासदांचा शिल्लक ऊस तात्काळ घ्यावा या प्रमुख मागणीसह  पूर्णा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी आंदोलकासाठी स्वतः च्या घरून आणलेल्या शिदोरी चे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी दुपारचे जेवण घेतले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या धरणे आंदोलनाची दाखल घेऊन पुर्णेचे तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांनी बळीराजा साखर कारखान्याच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली व पूर्णा तालुक्यातील सर्व सभासद व बगर सभासद शेतकऱ्याचा ऊस गाळप केल्याशिवाय बळीराजा साखर कारखाना गाळप बंद करणार नाही असे लेखी आश्वासन पूर्णेचे तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांनी दिल्या नंतर धरणे आंदोलन तात्पुरते स्वरूपात मागे घेण्यात आले व बळीराजा साखर कारखाना व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची वेळेत पूर्तता न झाल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासन व बळीराजा साखर कारखाना प्रशासनास देण्यात आला. आंदोलन स्थळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता.

आजच्या धरणे आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, युवा आघाडी तालुका प्रमुख नरेश जोगदंड, शहर प्रमुख संजय वाघमारे, सुरेश वाघमारे, मोतीराम भोसले, अप्पाराव तांबे, नवनाथ चेपेले, व्यंकटी डाखोरे, बाबुराव सोलव, मदन भोसले, चांदू सोलव, सुशील चोरे, गजानन परडे, त्रेंबक जोगदंड, सिध्देश्वर आगलावे, श्रीहरी इंगोले, चंपत कदम, राजेंद्र डाखोरे इत्यादींनी सहभाग नोंदविला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या