💥जिंतूर येथील राणी कॉलनीत वडिलोपार्जित भूखंड विक्रीच्या वादातून तिन भावात वाद : पुतन्याच्या मारहाणीत काकाचा मृत्यू....!


💥पुतन्याने डोक्यात लोखंडी रॉड घातल्याने जखमी झालेल्या शेख अलीचा उपचारा दरम्यान मृत्यू💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.२८ एप्रिल) - जिंतूर शहरातील राणी कॉलनी परिसरात वडिलोपार्जित भूखंड विक्रीच्या रकमेतून तिघा भावात वाद झाला या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले या घटनेत पुतण्याने काकाच्या डोक्यात लोखंडी रॉडनेबार केला. त्यात शेख अली हे गंभीर जखमी झाल्याची घटना १८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती.

उपचार सुरू असताना मंगळवार दि.२६ एप्रिल २०२२ रोजी दुपारच्या सुमारास शेख अली यांचा मृत्यू झाला.शहरातील राणी कॉलनीमधील शेख बिस्मिल्लाह यांना तीन मुले असून त्यांच्या मालकीचा जालना रस्त्यावर एक मोकळा भूखंड होता. हा भूखंड ३६ लाख रुपयांना विकल्या गेला; परंतु बिस्मिल्लाह यांचा मोठा मुलगा शेख रहीम याने भाऊ तिघा जणांविरुद्ध जिंतूर पोलिसांत गुन्हा दाखल केला शेख अमीन याला हाताशी धरून लहान भाऊ शेख अली यास सदरील भूखंड १८ लाख रुपायास विकल्या गेल्याचे भासवून त्याप्रमाणे त्यास वाट्याची रक्कम दिली काही दिवसानंतर शेख अली

शेख बिस्मिलाह यास सदरील भूखंड ३६ लाख रुपयास विकल्या गेल्याचे कळले. त्यावरून तो १८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या आरामशिन मध्ये शेख रहीम व शेख अमीन यास जाब विचारण्यासाठी गेला असता शेख रहीम शेख बिस्मिल्लाह, शेख अमीन शेख बिस्मिल्ला व शेख रहमान शेख रहीम या तिघांनी त्यास बेदम मारहाण केली.तसेच शेख रहमान याने लोखंडी रॉडने शेख अली यांच्या डोक्यावर वार केला मारहाणीत गंभीर जखमी झालेले शेख अली यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

उपचारा दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास उपचार सुरू असतानाच शेख अली मृत्यु झाला. याबाबत शेख शगुफ्ता शेख अली यांच्या फिर्यादीवरून वरील तिघा जणांविरुद्ध जिंतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही फरार आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या