💥पुर्णा-गौर मार्गावर २ दुचाकीस्वारांना निर्दैयीपणे उडवून फरार झालेल्या आयशर चालकाचा शोध लागेल काय ?


💥चुडावा पोलिस प्रशासनाकडून घटनेतील २६ वर्षीय मयत विकास सोनकांबळे यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची अपेक्षा💥 


पुर्णा (दि.२४ एप्रिल) - शहरातील मंदिर मुर्ती शिल्पकार दिनाजी सोनकांबळे यांच्या परिवाराचा एकमेव आधार एकुलता एक मुलगा विकास दिनाजी सोनकांबळे हा काल शनिवार दि.२३ एप्रिल २०२२ रोजी गंगाखेड येथून पुर्णा मार्गे किनवट तालुक्यातील बोधडी येथून मंदिराचे बांधकाम करण्यासाठी कामगारांची आवश्यकता असल्यामुळे कामगार घेऊन येण्यासाठी निघाला असता जाता जाता आपल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी पुर्णा-चुडावा मार्गातील गौर गावाजवळील फाट्याजवळून वापस मोटरसायकल पलटवत असतांना सुसाट वेगाने नांदेडच्या दिशेने निघालेल्या आयशरने दुपारी ०३-०० ते ०३-१५ वाजेच्या दरम्यान मोटरसायकला जोरदार धडक दिल्यामुळे विकास सोनकांबळे याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर सोबतचा सहकारी कामगार अनिकेत बोंबले राहणार बोधडी तालुका किनवट हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला तात्काळ नांदेड विष्णूपुरी येथील जिल्हा शासकीय रुग्नालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

 पुर्णा-चुडावा-नांदेड राज्यमार्गावरील गौर गावाजवळ दोन मोटारसायकल स्वारांना अत्यंत बेजवाबदारपणे आपले आयशर वाहन सुसाट वेगाने चालवून त्यांचा बळी घेणारा हा अज्ञात निर्दैयी वाहन चालक नांदेडच्या दिशेने गेला की चुडावा गावासमोरील वसमत फाट्यावरून हिगोली जिल्ह्यात फरार झाला याचा शोध घेण्याचे आव्हाण चुडावा पोलिस स्थानकाचे सपोनि.बाचेवाड व तपासणीस अधिकारी पिएसआय.पंडीत यांच्या समोर निर्माण झाले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या