💥बाळूमामाच्या भक्तांना सोयी सुविधा पुरवा - सखाराम बोबडे पडेगावकर


💥गंगाखेड न.पा.चे मुख्याधिकारी यांच्याकडे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली मागणी💥

गंगाखेड - प्रतिनिधी 

संत जनाबाई मंदिराच्या पाठीमागे बाळुमामाच्या पालखी च्या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना सोई सुविधा पुरविण्याची मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे


गंगाखेड शहरात दोन दिवसापूर्वी बाळूमामाच्या मेंढ्या व पालखी आलेली आहे. संत जनाबाई मंदिराच्या पाठीमागे बाळुमामाची पालखी आहे. पालखीच्या दर्शनासाठी शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. मोठा मारुती मंदिर पासुन बाळूमामाच्या पालखी कडे जाणाऱ्या मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे . पुलाच्या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडल्याने रस्ता अरुंद झाला आहे. तसेच नगरपालिकेने गावातील कचरा गोळा करून याच रस्त्यावर टाकलेला आहे . रस्त्यावर टाकलेला कचरा पेटवून देण्यात आल्यामुळे धूर पसरत आहे. रस्त्यांवर धूळ उडत आहे. त्यावर पाणी टाकणे गरजेचे आहे. उपस्थित महीला भक्तासाठी फिरते शौचालय व मुतारी उभारणे गरजेचे आहे.असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर, नारायण धनवटे, विक्रम बाबा इमडे,राहुल साबणे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या