💥नियमबाह्य रेती उत्खननात महसुल विभागातील झारीतील शुक्राचाऱ्यांचाच वरदहस्त....!


💥मानवी हक्क अभियानने दिले विभागिय आयुक्तांना निवेदन💥

किरण घुंबरे पाटील

पाथरी (दि.२८ एप्रिल) :- तालुक्यातील डाकूपिंप्री येथेल वाळू धक्यातून दिवसरात्र पोकलेन,जेसीबी मशीनचा वापर करत २० हजार ब्रॉस वर रेतीचे नियमबाह्य उत्खनन झालेले आहे. हा प्रकार सर्रास पणे जिल्हाधिकारी परभणी,उपविभागीय अधिकारी,पाथरी. तहसीलदार पाथरी यांच्या सहकार्यानेच सुरू असल्याचा आरोप करत मानवी हक्क अभियानने आता विभागीय अयुक्तांचे दार ठोठावले असून आता विभागीय आयुक्त या विषयी काय भूमीका घेतात हे पहाने उचीत ठरणार आहे.


मागील दोन दिवसा पुर्वीच डाकूपिंप्री ग्रामस्थांनी परभणी येथील के एम सी एजन्सी अॅन्ड कन्सल्टंट चे संचालक प्रो प्रा मोहमद मुन्तजिब खान वहिदखान यांच्या विरोधात नोटकॅम फोटो सह परभणी जिल्हाधिकारी यांना या विषयी निवेदन दिले होते.मात्र या वर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने गुरूवार २८ एप्रील रोजी पाथरी येथील मानवी हक्क अभियानच्या पदाधिका-यांनी आैरंगाबाद चे विभागिय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचे दरवाजे ठोठावले असून.आता विभागिय आयक्त नेमकी महसुल प्रशासना विषयी कोणती भुमीका घेतात या विषयी उत्सकता लागून राहिली आहे. मानवी हक्क अभियानवचे बी एन वैराळे आणि उत्तम झिंजिर्डे यांनी विभागिय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,डाकूपिंप्री येथील वाळू धक्यावर नियबाह्य रेती उपसा होत असल्याचे महसुल प्रशासनाला निदर्शनास आणुन दिले असता कोणतीही कार्यवाही केल्याजात नाही महसुलचे स्थानिक अधिकारी कर्मचारी हे या प्रकाराला पाठीशी घालत आहेत.


गट क्र १४०,१४१,१४४,१४५,९२, हया गटातून लांबी ५२० मीटर रुंदी ३५ मीटर खोली १ मीटर एकूण उत्खनन ६४३१ ब्रास रेती उत्खनन वाहतूक करण्याचे नियम व अटीच्या आधीन राहून आदेश पत्र दिलेले आहे. परंतु रेतीचे उत्खनन व वाहतूक करतानाच प्रशासकीय व स्थानीक महसुल यंत्रनेकडून उल्लंघन करण्यात आलेले आहे. दि. २३ मार्च २०२२ रोजी रेती घाटाच्या सिमा चिन्हांकीत करुन हद्दी बंधनकारक असताना नदीपात्रात पाणी असल्याचे कारण दाखवून चतुर्सिमा दर्शविलेल्या नाहीत असे मंडळ अधिकारी बाभळगांव यांनी सादर केलेला पंचनाम्यात नमुद करुन दि. २५ मार्च  रोजी के.एम.सी.एजंसी अॅन्ड कंन्सलटंट प्रो. प्रा. मोहम्मद मुन्तजिब खान वहीद खान यांना अटी व शर्तीच्या आधीन राहून मंडळ अधिकारी बाभळगांव एस. एस. आलेवार व तलाठी वि. एम. जमशेटे कान्सुर, यांनी रेती घाटाच्या चतुर्सिमा न दर्शविता ताबा दिला आहे. या नियमभंगात जिल्हा महसुल यंत्रना उपविभागीय अधिकारी पाथरी तसेच पाथरी तहसीलची महसूल यंत्रना गुंतलेले असल्याचे तुर्सिमा न दर्शविलेल्या वाळू घाटातील दि. २४ मार्च  रोजी जिल्हाधिकारी परभणी यांनी दिलेल्या आदेशातील नियम अट २७ चे उल्लंघन करत विहित केलेल्या क्षेत्राबाहेर वाळू/रेतीचे उत्खनन करत आहेत. अट क्रं. २९ नुसार मनुष्यबळाव्दारे उत्खनन करेण आवश्यक असताना अनेक जेसीबी यंत्र तसेच अनेक पोकलेंड यंत्र व एल.आर. मशीनव्दारे ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेर ठरवून दिलेल्या एक मीटर खोलीपेक्षा जास्त मिटर रेतीचे उत्खनन करुन नियय व अटीचे सर्रास उल्लंघन होत आहे. नियम  नुसार पोकलैंड, जेसीबी, एल.आर. मशीन या यंत्राचा वापर केल्यास सदर साधने जप्त करण्यात येतील असे नियमात असताना अनेक पोकलेंड, जेसीबी, यंत्राचा वापर केले असताना परभणी जिल्हाधिकारी, आंचल सुद गोयल, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी , पाथरी, तहसीलदार सौ. सुमन मोरे , पाथरी हे सर्व नियंत्रन केल्याचे नाटक करीत असून दिवसा ढवळ्या वापरलेल्या हया यंत्रासामुग्री जप्त न करता डोळेझाक करत आहेत. अट क्रं. ४२ नुसार लिलाव धारकास घालून दिलेल्या अटीचे मोहम्मद मुन्तजिब खान वहीद खान हे भंग करीत आसून नदीपात्रात दहा चाकी व बारा चाकी मोठी वाहने नदीपात्रातून नेऊन मोठया प्रमाणात रेती वाहतुक करीत आहेत. परंतु ट्रॅक्टर ट्रॅलीचा वापर करीत नसून या ठिकाणी सि.सि.टि.व्ही. कॅमेरे लावलेले नाहीत. 

आर्थीक गैर व्यवहारातून या नियमभंग बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याच प्रमाणे आदेशातील नियम ४५ लिलाव धारकानी बसवलेल्या सि.सि.टि.व्ही. अड्रेस जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासनाचा महसुल व वन विभागाकडे देणे आवश्यक असताना लिलाव धारकाने या शासकीय यंत्रनेकडे सि.सि.टि.व्हि. अॅड्रेस न देता नियम अटीचा भंग केला आहे. तसेच लिलावधारक वाहु उत्खनन वाहतुकीचे छायाचित्रन सिडी प्रत्येक पंधरा दिवसानी तहसील कार्यालयास जमा करणे अनिवार्य असताना या नियमाचा भंग करत आहेत. आदेशातील नियम क्रं. ७९ लिलाव धारकाने वाळू उत्खनन करताना मा. सर्वोच्च न्यायालय तसेच मा. हरित लवाद यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक असताना सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन लिलावधारक. सर्रास उल्लंघन करत आहे.

ही गौन खनिज अधिनियम आणि प्रशासकिय दृष्टया अत्यंत गंभीर बाब असल्याने यांची त्वरीत दखल घ्यावी परभणीचे जिल्हाधिकारी आंचल सुद गोयल मॅडम, पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, पाथरीचे तहसीलदार सौ. सुमन मोरे मॅडम, लिलावधारक मोहम्मद मुन्तजिब खान वहीद खान परभणी शासनाच्या नियम अटीचे भंग करण्याचा लिलाव धारकास पाठीशी घालत असल्याप्रकरणी शिस्तभंगाची कार्यवाही करुन नियमबाहय मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रेती/वाळुचे उत्खनन वाहतुक केल्या प्रकरणी लिलावधारक मो. मुन्तजिब खान यांच्यावर गुन्हा नोंद करुन दंडात्मक कार्यवाही करुन परवाना रद्द करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या