💥पत्रकाराला धमकी देणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर खामगाव येथे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल...!


💥हा तर पत्रकार एकतेचा विजय -- जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे

✍️ मोहन चौकेकर              

खामगाव : बुलढाणा बातमी पत्राचे संपादक आकाश पाटील यांनी खामगाव येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व्हि. एस. चव्हाण यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना फोणवरून अवाच्च शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती या विरोधात संपादक आकाश पाटील यांनी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते आज उपोषणाचा पाचवा दिवस होता जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन अभियंता व्हि.एस. चव्हाण यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीकरिता बुलढाण्यातील सर्व पत्रकारांनी निवेदन दिले होते.

यावेळी  खामगावच्या पत्रकारांनीही उपोषणाला पाठिंबा दिला होता. याची दखल आज घेत पोलिसांनी अभियंता व्हि.एस. चव्हाण यांच्यावर भा.द.वि ५०४,५०६ व  पत्रकार संरक्षण कायद्यानुसार (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.   त्यानंतर उपोषणाची सांगता जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या हस्ते आकाश पाटील यांना उसाचा रस पाजून उपोषण सोडविण्यात आले .  या वेळी बोलताना बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी हा पत्रकार एकजुटीचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी खामगाव तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या