💥पुर्णा तालुक्यातील मौ.कानखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी....!


💥यावेळी भिम जयंती महोत्सवाला मुख्य अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांची आवर्जून उपस्थिती💥 


पुर्णा (दि.२८ एप्रिल) -तालुक्यातील मौ.कानखेड येथे काल बुधवार दि.२७ एप्रिल २०२२ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,यावेळी भिम जयंती महोत्सवाला मुख्य अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी देशाच्या रक्षणासाठी भारतीय सेनेत सेवा बजावणारे कानखेड येथील फौजी सिद्धार्थ वाघमारे,युवा नेते रविभाऊ गायकवाड,सरफराज पठान अनिल काळे ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे आदींनी ही महामानवास अभिवादन केले.

यावेळी सार्वजनिक भिम जयंती महोत्सव समितीच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे प्रत्येक समाजाचा आदर व्हावा या दृष्टीने भिम जयंती मिरवणुकीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता अहिल्याबाई होळकर,हजरत टिपू सुलतान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा देखील लावून जातीय सलोखा जपत तसेच महापुरुषांचे विचार अंगीकारण्यावर विशेष भर दिला.

 महापुरुषांना जाती जातीत न वाटून घेता,त्यांचे विचार प्रत्येक समाजातील लोकांनी अंगीकारले पाहिजे,हाच शुद्ध हेतू समोर ठेवून कानखेड येथील सार्वजनिक भिम जयंती महोत्सव समितीने ऐतिहासिक भीम जयंती साजरी केली,गावातील काही जातीवादी लोक वगळता,गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी यात सहभाग नोंदवून जयंती साजरी केली.यापुढे ही आपण सर्व अशीच महापुरुषांच्या विचाराची जयंती साजरी करू हीच अपेक्षा असल्याचे यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे म्हणाले.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या