💥स्त्रियांनी ज्ञानाच्या क्षेत्रात सक्रिय होणे काळाची गरज आहे - प्रा. डॉ.संगीता आवचार


💥कै.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचा इंग्रजी विभागाच्या इंटरलिंक उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या💥

पूर्णा (दि.२७ एप्रिल) - स्त्रियांनी ज्ञानाच्या क्षेत्रात सक्रिय होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन परभणी येथील कै.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.संगीता आवचार यांनी केले.त्या येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील इंग्रजी विभाग आणि कै.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग यांच्या इंटरलिंक उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात बोलत होत्या.विर्थ्यांनी आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवून अध्ययन केले तरच जीवनात यशस्वी होता येते.कष्टाला न घाबरता कथा, कादंबरी, नाटक, कविता मोठ्या प्रमाणात वाचल्या

 पाहिजेत भाषा ही माणसाला सुसंस्कारित करित असते म्हणून विद्यार्थ्यांनी भाषेचे ज्ञान घेऊन व्यक्तिमत्त्व विकास करावा असेही त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.या व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संतोष कुऱ्हे हे होते तर गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ भीमराव मानकरे  यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ जितेंद्र देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा डॉ दिपमाला पाटोदे यांनी मानले.या व्याख्यानासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. विद्यार्थी सर्वांगिण विकास आणि व्यक्तिमत्व दिशादर्शक अनुषंगाने ज्ञानवर्धक विचार मांडणी.
    छान उपक्रम..
    " अभिनंदन मॅडम..💐💐💐

    उत्तर द्याहटवा