💥पुर्णेतील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी...!


💥यावेळी प्र.प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांनी हस्ते बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार करुन केले अभिवादन💥 

पूर्णा (जं)- येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात  भारताय संविधानाचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदेमंत्री, सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक क्रांतीचे प्रणेते बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 यावेळी महाविद्यालयाचे प्रा.प्राचार्य डॉ. संतोष कु-हे यांच्या हस्ते बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यादव कल्लाळीकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या