💥वाचन भावना वाढिस लागण्या साठीच जागतीक ग्रंथदिन - प्राचार्य डॉ.राम फुन्ने


💥ग्रंथ प्रदर्शनीच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलतांना त्यांनी आपले विचार व्यक्त केले💥


किरण घुंबरे पाटील

पाथरी (दि.२३ एप्रिल) :- जागतीक पुस्तक आणि कॉपीराईट दिन दर वर्षी २३ एप्रिल रोजी साजरा होत असतो. वल्डबुक कॅपिटल २०२० मलेशियाची राजधानी असलेल्या कॉलालंपुर येथे आहे.युनेस्को आणि त्या संबंधीत संस्था जगभरात जागतीक ग्रंथ दिवस साजरा करत असतात.लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान व्हावा हाच उद्देश जागतिक ग्रंथ दिनाचा असून आपल्या महाविद्यालयात आजच्या दिवशी ग्रंथालय विभागाने ग्रंथांची प्रदर्शनी भरवुन ख-या अर्थाने ग्रंथ आणि लेखकांचा सन्मान केल्याची भावना स्व नितीन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने यांनी ग्रंथ प्रदर्शनीच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.


आजादी का अमृत मोहोत्सवा निमित्त येथील स्व नितीन महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ  प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयक्यूएसी विभागाचे प्रा डॉ भारत निर्वळ,प्रा डॉ सुरेश सामाले,प्रा डॉ जगन्नाथ बोचरे,प्रा डॉ साहेब राठोड,प्रा डॉ आनंद इंजेगावकर,प्रा डॉ गणपती मोरे,प्रा रंजित गायके,प्रा डॉ मधूकर ठोंबरे,प्रा डॉ मारोती खेडेकर,प्रा डॉ अंकूश सोळंके,प्रा डॉ अर्चना बदने,प्रा डॉ शितल गायकवाड, प्रा संजयसिंग ठाकूर,प्रा डॉ आर एम जाधव, प्रा संदिप जाधव आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.या वेळी स्वतंत्र्य भारताच्या इतिहासाच्या ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या प्रदर्शनीत विद्यार्थी,विद्यार्थीनींनी सहभाग घेत ग्रंथां विषयी ग्रंथपाल कल्यान यादव यांच्या कडून माहिती घेतली. या ग्रंथप्रदर्शनी साठी ग्रंथपाल कल्याण यादव,प्रा डॉ हनुमान मुसळे,प्रा तुळशीदास काळे,डॉ शारदा पवार,किरण घुंबरे,महेश तौर,रमेश लिंगायत ,संतोष रोडगे,महादेव नखाते,सतिष काळदाते,रामदास बलवंते यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या