💥औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे बनावट पोलीसांनी केली चक्क अवैध वाळू वाहतूकदारांकडून केली वसुली....!


💥या प्रकरणी दोन तोतय्या पोलिसांना पोलिस प्रशासनाने रंगेहात घेतले ताब्यात💥 

औरंगाबाद (दि.२८ एप्रिल) - जिल्ह्यातील  सिल्लोड येथील बोरगाव फाटा परिसरात पोलिसी गणवेश धारण करून अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या रेती वाहतूकदारांना अडवून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या दोन तोतय्या पोलिसांना सिल्लोड पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना घडल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. 

या संदर्भात अधिक माहिती अशी की तालुक्यातील बोरगाव फाटा परिसरात रेतीची वाहतूक चालत असल्याने सदरील रेतीवाहतूकदारांना पोलिसी गणवेश धारण केलेल्या दोन तोतय्या पोलिसांनी अडवून पोलिसी आवेशात धमकावत ५ हजारांची खंडणी मागितली या संदर्भात माहिती मिळताच सिल्लोड पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन या दोन डुप्लीकेट पोलिसांना बोरगाव फाटा येथे आज गुरूवार दि.२८ एप्रिल रोजी पहाटे रंगेहाथ पकडले.

सिल्लोड पोलिसांनी अटक केलेल्या दोन तोतय्या पोलिसांची नाव अनुक्रमे अमित तडवी राहणार गोंदेगाव तालुका जामनेर हल्ली मुक्काम सातारा परिसर औरंगाबाद व आसिफ तडवी राहणार कासली तालुका जामनेर हल्ली मुक्काम टीव्ही सेंटर पोलीस चौकीच्या पाठीमागे औरंगाबाद असे आहेत.या प्रकरणी त्यांना खंडणी वसूल करण्यासाठी मदत करणारा तथाकथित पत्रकार मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे. या प्रकारामुळे सिल्लोड परीसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सिल्लोड तालुक्यातील बोरगाव फाटा येथे आज बुधवारी पहाटे अमित तडवी आणि आसिफ तडवी हे दोघे पोलिसांच्या वेशात उभे होते. त्यांनी वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर अडवले. आम्ही पोलीस आहोत, ५ हजार रुपये दे नसता ट्रॅक्टर जप्त करू, तुला ठाण्यात सडवून टाकू, अशी धमकी दोघांनी दिली. चालकाकडून पैसे उकळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोन्ही तोतया पोलिसांना रंगेहाथ पकडले आहे.

या दरम्यान, खंडणीसाठी एका तथाकथित पत्रकाराने मदत केल्याचे कळते त्याचाही पोलीस शोध घेत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या