💥पुर्णा तालुक्यातील रेती घाट लिलावधारकांकडून खुलेआम प्रशासकीय नियमांना पायदळी तुडवण्याचा गंभीर प्रकार...!


💥जेसीबी मशीनद्वारे रात्रंदिवस रेती उत्खनन : एसडीएम सुधीर पाटील यांच्यासह तहसिलदार टेमकर यांची भुमीका संशयास्पद💥 


परभणी जिल्ह्यातील महसुल प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे की काय ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून जिल्ह्यातील अधिकृत रेती घाटांसह अनाधिकृत रेती घाटांतून जेसीबी मशीनचा वापर करीत प्रतिरोज बेकायदेशीर रात्रंदिवस हजारो ब्रास रेतीच्या उत्खनन उत्खननासह शेकडो वाहनांतून तस्करी होत असतांना महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचाऱ्यांसह स्थानिक तहसिलदार उपविभागीय अधिकारी (एसडीएम) मुग गिळून गप्प का ? संबंधित जवाबदार अधिकारीच रेती घाट लिलावधारकांसह रेती तस्करांशी हात मिळवणी करीत महसुल प्रशासनाच्या नियम अटींना पायदळी तुडवण्याची रेती तस्करांना संधी देत असल्यामुळे रेती घाट लिलावधारक व रेती तस्कर संपूर्ण जिल्ह्यात नदीपात्रांवर अक्षरशः दरोडे घालत पर्यावरणासह कृषी उद्योगाला धोका निर्माण करीत आहेत.


परभणी जिल्ह्यात महसुल प्रशासनाच्या नियम अटींना पायदळी तुडवण्यात पुर्णा तालुका सर्वात आघाडीवर असल्याचे निदर्शनास येत असून तालुक्यातील पुर्णा नदीपात्रावरील मौ.कानखेड रेती घाट लिलावधारक अनिल मुन्नालाल अग्रवाल पुर्णा,मौ.पिंपळगाव बाळापूर रेती घाट लिववलावधारक प्रसाद पांचाळ परभणी,संदलापूर रेती घाट लिलावधारक सुदाम लक्ष्मण माने परभणी या लिलाव धारकांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे निदर्शनास येत असून संबंधित लिलावधारक ठराविक क्षेत्रासह नदीपात्रात सर्वत्र जेसीबी मशीनच्या साहाय्याने रात्रंदिवस हजारो ब्रास रेतीचे अतिरेकी उत्खनन करीत शेकडो वाहनांतून या अवैध चोरट्या रेतीची तस्करी करीत असल्याचे वृत्त पुराव्यासह वर्तमानपत्रांसह वेब वृत्तवाहिण्याद्वारे प्रसिध्द झाल्यानंतर महसुल प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे निघत असतांनाही महसुल प्रशासनातील गेंड्यांच्या कातडीचे अधिकारी कारवाई करीत नसल्यामुळे मुजोर रेती घाट लिलावधारक व रेती तस्करांची हिंमत कमालीची वाढल्याचे दिसत असून आतातर लोकप्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारींवर ही लघुशंका करीत असल्याचे पाहावयास मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आ.बाबाजानी दुर्रानी,गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिलेल्या तक्रारीला महसुल प्रशासनाने केराची टोपली दाखवली असतांनाच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आ.विजय भांबळे यांनी जिल्ह्यातील रेती घाटांवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रार देऊन जिल्ह्यातील रेती घाटांची ईटीएसद्वारे मोजनी करण्याची मागणी केली परंतु त्यांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह महसुल प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने कारवाई करण्याची मर्दुमकी दाखवलेली नाही.

पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदींची पात्र रात्रंदिवस जेसीबी मशीनच्या साहाय्याने अक्षरशः खरडली जात असतांना उपविभागीय अधिकारी (एसडीएम) सुधीर पाटील तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्यासह महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी आपल्या कर्तव्याशी दगलबाजी करीत रेती घाट धारकांना पाठबळ देण्याचे काम तर करीत नाही ना ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आता विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी गोयल यांच्यावर ही आली आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या