💥औरंगाबाद येथे १ मे रोजी शिवसेनेचे शिवसैनिक प्रशिक्षण शिबिर....!


💥या शिवसैनिक प्रशिक्षण शिबिरात शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती💥

 ✍️ मोहन चौकेकर

औरंगाबाद (दि.२८ एप्रिल) - शिवसेना औरंगाबाद शाखेच्यावतीने मतदान केंद्र रचना, विकासात्मक कार्य आदी विविध विषयांवर चर्चा विनिमाय करून संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करण्याच्या हेतूने १ मे रविवार रोजी दुपारी १:०० वाजता तापडिया नाट्य मंदिर,  औरंगाबाद या ठिकाणी शिवसैनिकांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे संयोजक शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळवले आहे.


या शिवसैनिक प्रशिक्षण शिबिरात शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई साहेब, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत, तसेच संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडी संपर्कप्रमुख मनीषा कायंदे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, वक्ता प्रशिक्षण प्रमुख शिवसेना महाराष्ट्र चे मारुती साळुंखे, युवा सेना विभागीय सचिव निखील वाळेकर, अभिमन्यू खोतकर  हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे.

 या प्रशिक्षण शिबिरास शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना,अंगीकृत संघटना तसेच उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखा संघटक, आजी-माजी नगरसेवक, युवासेना युवा अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, जयवंत ओक,अनिल पोलकर, राजेंद्र राठोड, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या