💥पुर्णेतील बुद्ध विहारात स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.....!


💥श्री गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन💥

पूर्णा (दि.२४ एप्रिल) ; भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा च्या वतीने भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी सकाळी ११-०० वाजता करण्यात आले होते.


श्री गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा चे प्राचार्य डॉ. राजकुमार सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्णा चे व्यवस्थापक गोपाळ काटोले यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थितांमध्ये भंते पया वंश भन्ते संघरत्न ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड आदींची उपस्थिती होती.

यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शना मध्ये पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी कठोर परिश्रम जिद्द सातत्यपूर्ण अभ्यास आपल्या ध्येयाप्रती असलेला दृढ आत्मविश्वास या जोरावर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो असे सांगितले प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर निरपेक्ष आणि निस्वार्थीपणे कार्य केले पाहिजे सुख आणि समाधान यामध्ये काय फरक असतो हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट करून सांगितले.

निस्वार्थी आणि नैतिक मार्गातून केलेल्या कार्यामधून तुम्हाला समाधान मिळू शकते असे ते म्हणाले स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पूर्णा चे व्यवस्थापक गोपाळ काटोले यांनी बँकिंग क्षेत्रात नोकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर संधी आहेत.

त्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन केले पाहिजे. विविध राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये कशा पद्धतीने नोकर भरती होते प्रीलिमरी एक्झामिनेशन   एक्झामिनेशन ची तयारी कशी करावी त्या साठी कोणती पुस्तके वाचावी परीक्षेचा पॅटर्न कसा असतो हे त्यांनी समजावून सांगितले राष्ट्रीयीकृत बँके अंतर्गत व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या योजनेचा फायदा तरुण-तरुणींनी घेतला पाहिजे.

यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले आपल्या अध्यक्षीय समारोप मध्ये प्राचार्य डॉक्टर राजकुमार यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विशद केले. प्रशासकीय अधिकारी होऊन देशाची आपण चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो.

बुद्ध विहारा मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले स्पर्धा परीक्षा साठी विद्यार्थी विद्यार्थिनी साठी विहारामध्ये स्वतंत्र अभ्यासिका आहेत सुसज्ज वाचनालय व ग्रंथालय आहे या बाबीचे त्यांनी कौतुक केले लायन्स क्लब पूर्णा चे अध्यक्ष राजेश धूत यांनी विहारा मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. व ग्रंथालयाला अभ्यासिकेला ग्रंथ भेट दिले.

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत जयंती मंडळाचे मार्गदर्शक प्रकाश कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानव मुक्तीचे विचार प्रखर राष्ट्रवादाचे विचार देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकता तर जयंती मंडळामार्फत व्याख्यानमाला व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर यशस्वीपणे राबवून आदर्श व सुसंस्कृत पिढी या माध्यमातून निश्चितपणे निर्माण होईल याप्रसंगी त्यांनी उपस्थित उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी तर प्रास्ताविक नितीन नरवाडे यांनी केले

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले, विजय खंडागळे, साहेबराव सोनवणे, भीमा वाहूळे, दिलीप गायकवाड उत्तम कांबळे विजय जोंधळे नागेश यंग डे मिलिंद सोनकांबळे मोहन लोखंडे मुकुंद पाटील विजय सातोरे सुरज जोंधळे प्रकाश जगताप आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या